बिग बॉस : ग्रॅण्डफिनालेमधूनही स्वामी ओमचा पत्ता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 10:23 PM2017-01-06T22:23:05+5:302017-01-06T22:26:57+5:30
बॉलिवूडचा भाई अर्थात सलमान खान याला जी व्यक्ती खटकते त्या व्यक्तीला तो पुन्हा आपल्याशी कधीच जोडत नाही, हा आजवरचा ...
ब लिवूडचा भाई अर्थात सलमान खान याला जी व्यक्ती खटकते त्या व्यक्तीला तो पुन्हा आपल्याशी कधीच जोडत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. बिग बॉस या शोला होस्ट करताना असे बरेचसे कंटेस्टेंट आहेत, ज्यांना तो कधीच बघणे पसंत करीत नाही. या सीझनमध्येही आतापर्यंत स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा या वादग्रस्ट कंटेस्टेंटविषयी तो प्रचंड नाराज असून, त्यांना कलर्सचे व्यासपीठ तो कधीच उपलब्ध करून देणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे.
प्रियंका जग्गानंतर नॉमिनेट न होताच घराबाहेर पडलेला वादग्रस्त स्वयंघोषित बाबा स्वामी ओम याला त्याने कलर्स चॅनलचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत. गलिच्छ वर्तणुकीमुळे घराबाहेर हकालपट्टी केलेल्या स्वामी ओमला आता ग्रॅण्डफिनालेमध्ये बोलावले जाऊ नये, असा सलमानने निर्णय घेतला आहे.
एका साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा सलमानला स्वामी ओमच्या ग्रॅण्डफिनालेमधील सहभागाबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने स्पष्ट शब्दात ‘स्वामी ओमला आता पुन्हा एंट्री नाही’ असे सांगितले. स्वामी ओमने घरात जी काही गलिच्छ वर्तणूक केली ती अजिबात मान्य करण्यासारखी नाही. त्यामुळे प्रियंका जग्गाबरोबरच स्वामी ओमही पुढच्या काळात कलर्सच्या व्यासपीठावर दिसणार नाही, हे निश्चित. फिनालेमध्ये शोमधील सर्व कंटेस्टेंटना बोलावण्याची पद्धत आहे; मात्र सलमानच्या निर्णयामुळे प्रियंका जग्गा आणि स्वामी ओम यांना न बोलावले जाण्याची शक्यता आहे.
आता सलमानच्या या निर्णयाचा निर्माते कितपत गांभीर्याने विचार करणार आहेत, हे ग्रॅण्डफिनालेमध्ये स्पष्ट होईलच; मात्र सलमान जो निर्णय घेतो, त्याला निर्मात्यांना मान्य करावेच लागते, हा आजवरचा इतिहास असल्याने स्वामी ओम आणि प्रियंका जग्गा फिनालेमध्ये दिसणार नाहीत, असा विचार प्रेक्षक करीत असावेत.
गेल्या सीझनमधील ग्रॅण्डफिनालेला उपस्थित असलेले कंटेस्टेंट