फोटोशूट करताना बिग बॉस विनर शिल्पा शिंदेचा दिसला फनी अंदाज, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 12:11 PM2018-02-03T12:11:24+5:302018-02-03T17:41:35+5:30
बिग बॉस ११ ची विजेती शिल्पा शिंदे हिने नुकताच एक फोटोशूट केला असून, त्यामध्ये तिचा फनी अंदाज दिसून आला, पाहा व्हिडीओ!
ब ग बॉस सीजन ११ ची विजेती शिल्पा शिंदे सध्या प्रचंड व्यस्त आहे. कारण बिग बॉसच्या घराबाहेर पडलेले जवळपास सर्वच स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी पार्टी करताना दिसत असताना शिल्पा मात्र यापासून दूर असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा आणि बिग बॉसचा स्पर्धक सब्यसाचीचे काही फोटोज् सोशल मीडियावर बघावयास मिळाले. या फोटोंमध्ये शिल्पा सब्यसाचीसोबत किचनमध्ये बघावयास मिळत होती. आता पुन्हा एकदा शिल्पाचे काही फोटोज् आणि व्हिडीओ समोर आले असून, त्यामध्ये ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.
वास्तविक हे व्हिडीओ शिल्पाच्या एका फोटोशूटचे आहेत. व्हिडीओमध्ये शिल्पा खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पाने ब्लॅक गाउन व्यतिरिक्त गोल्डन साडी परिधान केली आहे. शिल्पाचे हे शूट माया फॅशन फोटोग्राफरने केले. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर शिल्पाने सांगितले होते की, शो संपल्यानंतर ती घरातील एकाही सदस्याला भेटणे पसंत करणार नाही. या शोमध्ये पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा यांच्यासोबत तिचे चांगले संबंध होते. त्यामुळेच ती या दोघांना काही दिवसांपूर्वी भेटली. त्याव्यतिरिक्त तिने एकाही इतर स्पर्धकाला भेटण्यात रुची दाखविली नाही.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात हिना खान आणि तिची कधीच गट्टी जमली नाही. या दोघींनी नेहमीच एकमेकींच्या विरोधात भूमिका घेतली. आता घराबाहेर पडल्यानंतरही दोघींमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचे दिसते. कारण दोघींना एकत्र येण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्या टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. याशिवाय अर्शी खानसोबतचे संबंधही शिल्पाने पूर्णपणे तोडल्याचे दिसून येते.