'नवरी मिळे हिटरला'मध्ये मोठा ट्विस्ट, अंतरामुळे एजे-लीलाच्या नात्यात होणार बदल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:22 IST2025-04-01T15:22:10+5:302025-04-01T15:22:43+5:30

Navari Mile Hitlerla Serial : 'नवरी मिळे हिटरला' मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. पुन्हा एकदा अंतराची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता एजे आणि लीलाच्या नात्यात बदल होणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Big twist in 'Navari Mile Hitlerla', will AJ-Leela's relationship change due to distance? | 'नवरी मिळे हिटरला'मध्ये मोठा ट्विस्ट, अंतरामुळे एजे-लीलाच्या नात्यात होणार बदल?

'नवरी मिळे हिटरला'मध्ये मोठा ट्विस्ट, अंतरामुळे एजे-लीलाच्या नात्यात होणार बदल?

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlerla) मधील एजे आणि लीला यांची केमिस्ट्री प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसते आहे. सुरुवातीला एकमेकांचा तिरस्कार असणारे आणि एकमेकांविषयी मनात गैरसमज असणारे एजे आणि लीला आता एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. लीलाने प्रेम व्यक्त केल्यानंतर एजेने तिचे प्रेम नाकारले होते. त्यावेळी त्याचे पहिली पत्नी अंतरावरच प्रेम असल्याचे म्हटले होते. मात्र हळूहळू तोदेखील लीलाच्या प्रेमात पडला. मात्र आता मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. पुन्हा एकदा अंतराची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता एजे आणि लीलाच्या नात्यात बदल होणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

मालिकेत एकाचवेळी खूप काही घडामोडी दिसत आहेत. घरात गुढीपाडवा साजरा होत आहे आणि त्या सोबतच घरात एक गोड बातमी ही येणार आहे. तर दुसरीकडे एजेच्या पहिल्या बायकोने म्हणजेच अंतराने मालिकेत पुन्हा एन्ट्री घेतली आहे. अंतराच्या येण्याने एजे-लीलाच्या नात्यात काय बदल घडतील वेळच सांगेल. पण सध्या गुढीपाडवा दोघे एकत्र साजरा करत आहेत. एजे आणि लीला गुढी उभारतात. सकाळपासून लीलाच्या हातून काही ना काही विचित्र गोष्टी घडतायेत, त्यामुळे सरोजिनीला वाटतंय काहीतरी अपशकुन घडणार आहे. 


एजे, लीला आणि सरोजिनी मंदिरात गेले असताना, सरोजिनीला अचानक अंतरा दिसते. तर एजेला वाटतंय की लीला त्याचा वाढदिवस विसरली आहे पण लीला जेव्हा त्याच्यासाठी केक घेऊन येते जो पुन्हा एजे तोंडावर पडतो आणि जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात. दोघेही आनंदी आहेत. लीला एजेच्या वाढदिवसासाठी ग्रँड सेलिब्रेशन प्लॅन करते. घरात गोड बातमी आहे ज्यासाठी लीला एका खास पोस्टर बनवते आणि ती एजेला ते उघडण्यास सांगते. त्यामध्ये  कुटुंबातील सर्व स्त्रिया एका बाळाची काळजी घेताना दिसत आहेत. या खास प्रसंगी एजे ५१% व्यवसाय समभाग लीलाला देण्याची घोषणा करतो. घरात इतकं आनंदाचं वातावरण असताना सर्व कुटुंब मिळून एक खास गाण्यावर डान्स करणार आहेत. 
लीला आणि तिच्या परिवाराच्या आनंदाला कोणाची वाईट नजर लागेल ? अंतराच्या येण्याने एजे- लीलाच्या नात्यात काही बदलेल का? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Big twist in 'Navari Mile Hitlerla', will AJ-Leela's relationship change due to distance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.