'पिंगा गं पोरी पिंगा'मध्ये मोठा ट्विस्ट, कोण आहे 'अनिमेश'? श्वेताच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:53 IST2025-04-07T16:52:55+5:302025-04-07T16:53:19+5:30

'Pinga Ga Pori Pinga Serial : 'पिंगा गं पोरी पिंगा'मध्ये बऱ्याच धक्कादायक घटना एकामागोमाग घडताना दिसत आहेत.

Big twist in 'Pinga Ga Pori Pinga', who is 'Animesh'? Shweta's father's shocking revelation | 'पिंगा गं पोरी पिंगा'मध्ये मोठा ट्विस्ट, कोण आहे 'अनिमेश'? श्वेताच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा

'पिंगा गं पोरी पिंगा'मध्ये मोठा ट्विस्ट, कोण आहे 'अनिमेश'? श्वेताच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा

पिंगा गं पोरी पिंगा(Pinga Ga Pori Pinga Serial)मध्ये बऱ्याच धक्कादायक घटना एकामागोमाग घडताना दिसत आहेत. मिठूवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता संशयाची सुई सगळ्या पिंगा गर्ल्सवर आली आहे, त्यात काही. हा गुंत्यात सगळ्या अडकणार हे जरी खरं असलं तरीदेखील बुलबुल बागमध्ये सध्या एकच प्रश्न गाजतोय. 'अनिमेश' खरंच आहे की हा फक्त श्वेताच्या मनाचा खेळ? मिठू प्रकरणाने घेतलेलं हे नवं वळण आता साऱ्या रहस्याच्या मुळाशी जाऊ पाहतंय. श्वेताच्या वडिलांनी केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर पिंगा गर्ल्सच्या पायाखालची जमीन सरकते.

बुलबुल बागमध्ये घडलेल्या मिठू प्रकरणात जेव्हा सर्वजण एका उत्तराच्या शोधात होते, तेव्हा प्रकरणात अटक झालेल्या श्वेताच्या वडिलांनी केलेला धक्कादायक खुलासा सगळ्यांनाच हादरवून टाकतो. त्यांच्या मते, श्वेताला पूर्वीपासूनच भास होण्याचा त्रास आहे आणि तिच्या आयुष्यात 'अनिमेश' नावाचा कोणी व्यक्ती खरंच अस्तित्वात असण्याची शक्यता नाही असं त्यांनी सांगितले आहे. वल्लरीचा संपूर्ण विश्वास आहे श्वेतावर पण जेव्हा तिचेच वडील सांगतात, अनिमेश नावाचा कोणच नाही. तेव्हा वल्लरीच्या समोर पेच निर्माण होतो की, वडिलांचं ऐकायचं की श्वेतावर विश्वास ठेवायचा. 


असं काय श्वेता सांगते ज्यामुळे पोलीस तपासात गोंधळ निर्माण होतो. पोलीस श्वेताचा फोन तपासायचा निर्णय घेतात आणि फोन हॅक करून त्यामधील पुरावे शोधण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिठू आणि समीर यांच्यात वाद झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याने, समीरलाही तपासात ओढण्यात आले आहे. समीर त्यांची बाजू मांडतो, मात्र चौकशीचा फास टाईट होत चाललेला आहे. 

वल्लरीवर दुहेरी दबाव
मीरा वल्लरीला स्पष्ट सांगते की तिलाही चौकशीला सामोरं जावं लागेल. रिपोर्टर्सनी बुलबुल बागवर ताबा मिळवताच, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडते. प्रेरणा आणि वल्लरीच्या घरी अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होते. सगळ्या मुली या संशयाच्या सावटामुळे मानसिक त्रासात आहेत. वल्लरी एकीकडे श्वेताला समजून घेण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे मिठूच्या सत्यासाठी झगडत आहे. तिच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. श्वेताचं सत्य शोधायचं की मिठूचं न्याय मिळवायचं? पुढे काय? सर्व उत्तरं लवकरच उलगडणार आहेत.

Web Title: Big twist in 'Pinga Ga Pori Pinga', who is 'Animesh'? Shweta's father's shocking revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.