'सावली होईन सुखाची' मालिकेत मोठा ट्विस्ट, बिट्टीला कळणार तिचे खरे वडील कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:38 IST2024-09-19T15:37:49+5:302024-09-19T15:38:13+5:30
Sawali Hoin Sukhachi :'सावली होईन सुखाची' मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक वळणे पाहायला मिळणार आहेत.

'सावली होईन सुखाची' मालिकेत मोठा ट्विस्ट, बिट्टीला कळणार तिचे खरे वडील कोण?
सन मराठी वाहिनीवरील मालिका 'सावली होईन सुखाची'(Sawali Hoin Sukhachi)मध्ये कुटुंबाची गोष्ट तर आहेच पण त्यासोबत मोलकरीण आणि अनाथ मुलीची गोष्ट देखील दाखवण्यात आली आहे. ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत असून आपल्या मंत्रमुग्ध करणारे कथानक आणि दमदार कलाकारांच्या कामगिरीने या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत सीमा कुलकर्णी आणि रौनक शिंदे आहेत तसेच बिट्टीची भूमिका आरंभी उबाळे साकारत आहे.
मालिकेच्या सुरुवातीपासून आपण पाहिलं आहे की बिट्टी ही अनाथ आणि रस्त्यावर भिक मागून राहणारी मुलगी दाखवली होती. तिच्या आई-वडिलांच्या नावावर एवढे दिवस प्रश्न चिन्ह होतं पण आता या प्रश्नचिन्हाचं उत्तर सर्वांना मिळणार आहे. तिची खरी आई देविका तिला शोधत आली आहे.
येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक वळणे पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण रहस्य उघडकीस येणार आहे ते म्हणजे बिट्टीच्या बाबाचं. देविका उघड करते की सुमीत हाच खरा बिट्टीचा बाबा आहे. हे सत्य सर्वांसमोर येताच देविका बिट्टीला घेऊन घर सोडण्याचा निर्णय घेते. पुढे अजून काय उघडकीस येईल, हे अद्याप स्पष्ट नाही - देविका आणि बिट्टी खरंच घर सोडतील का? 'सावली होईन सुखाची' सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त सन मराठीवर पाहायला मिळेल.