'सारं काही तिच्यासाठी'मध्ये मोठा ट्विस्ट, नीरजचं कोणतं सत्य कळलंय रघुनाथला खोतांना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 13:01 IST2024-02-19T13:00:58+5:302024-02-19T13:01:20+5:30
Sare Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत निशी- नीरजच्या प्रेमाची परीक्षा सुरूच आहे.

'सारं काही तिच्यासाठी'मध्ये मोठा ट्विस्ट, नीरजचं कोणतं सत्य कळलंय रघुनाथला खोतांना?
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत निशी- नीरजच्या प्रेमाची परीक्षा सुरूच आहे. आतापर्यंत मुलींना नात्यात अग्निपरीक्षा देताना पहिले असेल पण 'सारं काही तिच्यासाठी'मध्ये नेहमीच काही तरी वेगळे बघायला मिळते. नीरज या अग्निपरिक्षेत पास होईल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
दरम्यान, मालिकेत नीरजने काय नाही केले निशीच्या वडिलांचा म्हणजे रघुनाथ खोतांचा विश्वास मिळवण्यासाठी, त्याच्या आणि निशीच्या नात्याला मंजुरी मिळवण्यासाठी. खोतांच्या घराबाहेर आपलं घर मांडलं, आणि आता तर चक्क आगीत जाऊन निशीला वाचवणार आहे. उमाची साथ नीरजला पहिल्या पासूनच आहे. पण रघुनाथच खोतांच मन जिंकणं इतकं सोपं नाही.
नीरज आपल्या अपहरणाची बातमी ही लपवतो कारण हे सर्वानाच माहिती आहे की जर ही बातमी बाहेर पडली तर पहिला संशय रघुनाथ खोतांवरच येईल आणि नीरजला गोष्टी अजून चिघळलेल्या नको आहेत. पण उमाच्या मनात शंका आहे की नीरज काहीतरी लपवतोय आणि ती रघुनाथ खोतांसमोर हे व्यक्त करते, उमा अजून ही नीरजची बाजू घेतेय म्हणून तो संतापतो. पण शेवटी रघुनाथ खोतांसमोर नीरजच सत्य समोर येताच. नीरजचे कोणते सत्य कळलंय रघुनाथ खोतांना ? ते नीरजला माफ करतील की अजून एक नवीन युद्ध सुरु होईल ? हे जाणून घेण्यासाठी पाहावी लागेल 'सारं काही तिच्यासाठी' संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर.