'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत मोठा ट्विस्ट, नेत्रा करणार अस्तिकाचा वध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 10:42 AM2024-04-05T10:42:53+5:302024-04-05T10:43:17+5:30

Satvya Mulichi Satavi Mulgi : झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेला नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले. या मालिकेत सध्या वरचढ ठरत असलेल्या विरोचकाला त्रिनयना देवीच्या लेकी छोबीपछाड देण्याच्या तयारीत आहे.

Big twist in 'Satvya Mulichi Satavi Mulgi' serial, Netra will kill Astika | 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत मोठा ट्विस्ट, नेत्रा करणार अस्तिकाचा वध

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत मोठा ट्विस्ट, नेत्रा करणार अस्तिकाचा वध

झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेला नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले. या मालिकेत सध्या वरचढ ठरत असलेल्या विरोचकाला त्रिनयना देवीच्या लेकी छोबीपछाड देण्याच्या तयारीत आहे. आस्तिका कोण आणि नेत्रा कोण याचा उलगडा घरातील सदस्यांना झाला आहे. दरम्यान आता मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत अस्तिका विरोचकाने दिलेला काळा मणी तिच्याकडे असल्यामुळे सुरक्षित रहात होती. हे अव्दैत नेत्राला सांगतो. त्याचवेळी रूपालीसुद्धा अस्तिकाला सांगते की अव्दैत-नेत्रा दोघे मिळून तुझा वध करण्याचा प्रयत्न करतील. तसेच घरातील सगळेजण त्यांना साथ देतील. त्या आधीच अव्दैतचा जीव घे आणि नागरूपात येऊन खोलीत लपून रहा. अस्तिका गोंधळून जाते, काय करावं हे तिला कळत नाही. त्यानंतर ती अव्दैतच्या प्रेमळ बोलण्यात अडकते. तरीही रूपाली अस्तिकाला अव्दैतच्या जाळ्यातून सोडवते आणि तिला सांगते, की अव्दैतला पुन्हा मारण्याचा प्रयत्न कर.

नेत्रा विरोचकाची खेळी पूर्णपणे ओळखते. आणि घरातल्या सर्वांना एकत्र रहा असं सांगते. त्यानंतर नेत्रा अस्तिकाचा वध करण्यासाठी काय मार्ग असू शकेल, यावर विचार करते. राजाध्यक्ष कुटुंब नेत्राला अस्तिकाचा वध करताना कशी मदत करणार, नेत्रा अव्दैतचा जीव वाचवून मग अस्तिकाचा वध कसा करणार, हे प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे.

Web Title: Big twist in 'Satvya Mulichi Satavi Mulgi' serial, Netra will kill Astika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.