'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत मोठा ट्विस्ट; बँकेच्या गैरव्यवहाराची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 07:57 PM2022-01-13T19:57:42+5:302022-01-13T20:04:24+5:30

'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhye Bharali) मालिकेच्या आगामी भागामध्ये रंजक घटना-घडामोडी मालिकेत घडणार आहेत.

Big twist in the series 'Sundara Manamadhye Bharli'; Bank malpractice will be investigated | 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत मोठा ट्विस्ट; बँकेच्या गैरव्यवहाराची होणार चौकशी

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत मोठा ट्विस्ट; बँकेच्या गैरव्यवहाराची होणार चौकशी

googlenewsNext

सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhye Bharli) या मालिकेत सध्या नवीन वळण आले असून या मालिकेत बँकेत होणाऱ्या गैरव्यवहाराबद्दल चौकशी होणार आहे. लतिका आणि सज्जनराव आबासाहेबांकडे गैरव्यवहाराबद्दल चौकशी करण्यासाठी त्याची परवानगी मागणारे पत्र घेऊन येतात. त्यामुळे पुढे मालिकेत काय घडणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

मालिकेत दौलत आणि आबासाहेब हे दोघे जण चर्चा करत असतात. चर्चा करत असताना आबासाहेब दौलतवर रागावलेले असतात. तुम्ही केलेल्या तक्रारीमुळे आता मला मिटींगला जावे लागणार, असे चिडून दौलतला बोलतात. एवढ्यातच आबासाहेबांना तुम्ही मिटींगला केव्हा येत आहात असा फोन येतो. आबासाहेब म्हणतात, मी थोड्याच वेळात मीटिंगला पोहोचत आहे. खोलीतून आबासाहेब निघून जातात. यानंतर दौलत विचारात मग्न असतो. विचार करताना तो खोलीतून बाहेर पडतो. बाहेर दौलत चकरा मारत असतो. तेवढ्यातच लतिका व सज्जनराव तिथे येतात. दौलत चकरा मारताना पाहून लतिका सज्जनरावला म्हणते की, तुम्ही पुढे जा. सज्जन पुढे जातो तेव्हा दौलत त्याला प्रश्न विचारतो की, इथे कशासाठी आला आहेस. तुझे इथे काय काम आहे, असे विचारून दौलत सज्जनला अडवतो. सज्जन म्हणतो की, मी कामासंदर्भात तेथे बोलायला आलो आहे. आबासाहेबांना हे पत्र दाखवायचे आहे. यावर आबासाहेबांची सही हवी आहे. दौलत म्हणतो, हे पत्र कशाचे आहे तूच वाच आणि मला सांग, असे म्हणून ते पत्र खाली फेकून देतो. लतिका ते पत्र उचलते आणि वाचते. पत्र वाचून झाल्यावर दोघे जण म्हणतात की, बँकेत गैरव्यवहार होत आहे. या होणाऱ्या गैरव्यवहाराच्या संदर्भात आम्हाला चौकशी करायची आहे.


सज्जन म्हणतो की, आबासाहेबांकडे सर्व फाईल आहेत. त्या फाईल आम्हाला न्यायच्या आहेत. त्यामुळे आम्हाला कळेल की नेमके कशाप्रकारे होत आहेत, तर दुसरीकडे दौलत डुप्लिकेट सही केलेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी माणसं लावतो. सज्जन म्हणतो की, जर आम्हाला या फायली मिळाल्या नाहीतर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तूमची चौकशी देखील होऊ शकते. त्यावेळी आम्ही काहीच करू शकणार नाही जर फाईल मिळाल्या तर आम्ही रिपोर्ट तशा प्रकारे बनवू शकतो. त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये रंजक घटना-घडामोडी मालिकेत घडणार आहेत.

Web Title: Big twist in the series 'Sundara Manamadhye Bharli'; Bank malpractice will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.