Bigg Boss 13 : माहिरा शर्माने नकार दिल्यानंतरही पारस छाब्राने तीन वेळा केले KISS, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 10:57 AM2019-12-19T10:57:56+5:302019-12-19T11:11:23+5:30

‘बिग बॉस 13’मध्ये आत्तापर्यंत प्रेक्षकांनी पारस छाब्रा व माहिरा शर्माची केवळ मैत्री पाहिली. पण आता त्यांच्या प्रेमाला बहर आला आहे.

bigg bos 13 paras chhabra and mahira sharma love story start his girlfriend akanksha puri reacts | Bigg Boss 13 : माहिरा शर्माने नकार दिल्यानंतरही पारस छाब्राने तीन वेळा केले KISS, व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 13 : माहिरा शर्माने नकार दिल्यानंतरही पारस छाब्राने तीन वेळा केले KISS, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देपारस माहिराला किस करताना पाहून त्याची गर्लफ्रेन्ड आकांक्षा प्रचंड संतापली आहे.

बिग बॉस 13’मध्ये आत्तापर्यंत प्रेक्षकांनी पारस छाब्रामाहिरा शर्माची केवळ मैत्री पाहिली. पण आता त्यांच्या प्रेमाला बहर आला आहे. होय, पारस आणि माहिरा यांनी बिग बॉसच्या घरात एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली, असे म्हणायला आता हरकत नाही. होय, ‘बिग बॉस’च्या ऑफिशिअल सोशल मीडियावर पेजवर पारस व माहिराच्या प्रेमाची साक्ष देणारा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. पारस व माहिरा एकमेकांच्या प्रेमात? असे कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना दिले गेले आहे. यात पारस माहिराला किस करताना दिसतोय. माहिरा नको म्हणत असतानाही पारस तीनवेळा तिला किस करतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

  या व्हिडीओमध्ये पारस आणि माहिरा  गप्पा मारताना दिसत आहेत. काहीवेळ गप्पा मारल्यानंतर पारस तिला गालावर किस करतो. माहिरा पारसला  नको म्हणते, पण पारस पुन्हा तिला किस करतो. त्यानंतर माहिरा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते मात्र पारस तिला जवळ ओढतो आणि तिसºयांदा किस करतो. या व्हिडीओनंतर पारस व माहिराचे प्रेम जगजाहिर झाले आहे. अर्थात चाहते मात्र यामुळे भडकल्याचे पाहायला मिळते आहे.


अनेक चाहत्यांनी हे सर्व नाटक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका चाहत्याने, आता माहिराला आईची भीती वाटत नाही का? असा खोचक सवाल केला आहे. तर काहींनी पारस व माहिरा नाटकी असून त्यांच्यापेक्षा आसिम आणि हिमांशी अधिक क्यूट असल्याचे म्हटले आहे. काही चाहत्यांनी तर आता बिग बॉसकडे दाखवण्यासाठी काहीच उरले नाही का? असा प्रश्न केला आहे.

भडकली गर्लफ्रेन्ड

पारस माहिराला किस करताना पाहून त्याची गर्लफ्रेन्ड आकांक्षा प्रचंड संतापली आहे. एका मुलाखतीत तिने आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. पारसला बघून मला धक्का बसला. पारस तीन महिन्यांपासून बिग बॉसच्या घरात करतोय ते सत्य आहे की आमचे तीन वर्षांचे नाते सत्य आहे, हेच मला कळेनासे झाले आहे. आमच्या नात्यावर आता मला संशय होऊ लागला आहे. मी केवळ तो बाहेर येण्याची वाट पाहतेय, असे आकांक्षाने म्हटले.
 

Web Title: bigg bos 13 paras chhabra and mahira sharma love story start his girlfriend akanksha puri reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.