Bigg Boss Unknown Facts: कसं तयार होतं ‘बिग बॉस’चं घर? किती आहे किंमत? कोण आहे मालक? जाणून घ्या Unknown Facts

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 08:00 AM2022-09-17T08:00:00+5:302022-09-17T08:00:01+5:30

Bigg Boss Unknown Facts: ‘बिग बॉस 16’ सुरू होणार म्हटल्यावर बिग बॉस प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फॅन्स क्रेझी झाले आहेत. पण ‘बिग बॉस’बद्दल काही गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

Bigg Bos 16 bigg boss unknown fact more than 500 workers prepare the house | Bigg Boss Unknown Facts: कसं तयार होतं ‘बिग बॉस’चं घर? किती आहे किंमत? कोण आहे मालक? जाणून घ्या Unknown Facts

Bigg Boss Unknown Facts: कसं तयार होतं ‘बिग बॉस’चं घर? किती आहे किंमत? कोण आहे मालक? जाणून घ्या Unknown Facts

googlenewsNext

Bigg Boss Unknown Facts:  टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो अशी ओळख असलेल्या ‘बिग बॉस’चा 16 वा सीझन (Bigg Boss  16) येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होतंय. 1 ऑक्टोबरला ‘बिग बॉस 16’चा ग्रँड प्रीमिअर होईल. पहिल्या दिवशी अर्धा भाग दिसेल आणि दुसऱ्या दिवशी उर्वरित भाग प्रसारित केला जाईल. टीव्ही स्क्रीनवर सलमान खान पुन्हा एकदा स्वॅगसह सर्वांचं स्वागत करेल. ‘बिग बॉस 16’ सुरू होणार म्हटल्यावर बिग बॉस प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फॅन्स क्रेझी झाले आहेत. पण ‘बिग बॉस’बद्दल काही गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का? आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
दरवर्षी ‘बिग बॉस’चं घर वेगवेगळ्या थीमनुसार सजवण्यात येतं. पण हे घर कोण डिझाईन करतं? हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तर रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनचं घर सजवण्याची जबाबदारी इंटिरिअर डिझाईनर विनीता आणि तिचा पती व आर्ट डिझाईनर उमंग कुमार यांना दिली जाते. 

विनीता व उमंग प्रत्येक सीझनमध्ये ‘बिग बॉस’चं घरं सजवतात. अर्थात हे काम वाटतं तितकं सोप्प नाही. सहा महिने दिवसरात्र खपल्यानंतर हे घर तयार होतं. 500 ते 600 मजूर दिवसरात्र काम करतात. त्यांच्या मदतीने हे सुंदर घर उभं राहतं. 

‘बिग बॉस’च्या घरात कंटेस्टंट येतात आणि मज्जा करतात. या घराच्या एका दिवसाच्या वीज आणि पाण्यावर सुमारे 15 ते 20 हजार रूपयांपर्यंत खर्च येतो. एकदा शो सुरू झाला की एक मोठ्ठ युनिट 8-8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतं. एका शिफ्टमध्ये सुमारे 250 ते 300 क्रू मेंबर्स काम करतात. स्पर्धकांच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवतात. 
‘बिग बॉस’च्या घरात 90 पेक्षा अधिक कॅमेरे लागले असतात. या कॅमेऱ्यांपासून बचाव शक्य नाही. अनेक सीझनपर्यंत ‘बिग बॉस’चं घर लोणावळ्यात होतं. पण आता ते मुंबईतील फिल्मसिटीत शिफ्ट झालं आहे.

 

‘बिग बॉस’च्या या घराची किंमत किती असावी? तर अंदाजे 100 कोटींच्या घरात.  हा कार्यक्रम नेटलँड रिअ‍ॅलिटी कार्यक्रम ‘बिग ब्रदर’ची फ्रँचाइज आहे. भारतामध्ये या कार्यक्रमाची निर्मिती एंडेमॉल शाइन इंडियातर्फे केली जाते. ही कंपनी बिग बॉसचं घर भाड्यानं घेते आणि तिच या घराची मालक असते.

‘बिग बॉस 16’च्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते फोटो ‘बिग बॉस 16’च्या थीमचे असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी बीबी हाऊसची थीम वॉटर असणार आहे. टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, बीबी हाऊस ब्ल्यू कलरने रंगवण्यात येणार आहे. घराच्या भींतींवर अनेक जलचरांचे पोस्टर्स दिसतील. एकंदर काय तर ब्ल्यू है पानी पानी.. प्रमाणे यंदा बीबी हाऊस ब्ल्यू ब्ल्यू होणार आहे. तथापि या व्हायरल फोटोमध्ये काही तथ्य आहे की नाही याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Web Title: Bigg Bos 16 bigg boss unknown fact more than 500 workers prepare the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.