Bigg Boss 10 : ग्रॅण्डफिनालेला सलमान खान करणार Boycott
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 01:17 PM2017-01-20T13:17:11+5:302017-01-20T13:21:00+5:30
बिग बॉसचा सिझन १० अंतिम टप्यात असून, ग्रॅण्डफिनालेकडे वाटचाल करीत आहे. मात्र शोच्या सुरुवातीपासून निर्माण झालेले वाद अजुनही थांबण्याचे ...
ब ग बॉसचा सिझन १० अंतिम टप्यात असून, ग्रॅण्डफिनालेकडे वाटचाल करीत आहे. मात्र शोच्या सुरुवातीपासून निर्माण झालेले वाद अजुनही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला प्रियंका जग्गा, नंतर स्वामी ओम यांच्यामुळे वादाच्या भोवºयात सापडलेला या शोच्या फिनालेला सलमान खान बायकॉट करण्याची शक्यता आहे. याचे एमकेव कारण स्वामी ओम हेच असून, सलमान खान अन् शोच्या निर्मात्यांमध्ये नवी जंग छेडली जाण्याची शक्यता आहे.
शोमध्ये गलिच्छ वर्तणुक करणाºया प्रियंका जग्गा आणि स्वामी ओमची घरातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळेस सलमान खानने स्पष्ट केले होते की, हे दोघानाही पुन्हा बिग बॉसच्या घरात एंट्री दिली जाणार नाही. त्याचबरोबर कलर्स चॅनेलवरील कुठल्याही कार्यक्रमात स्वामी ओमला सहभागी होऊ देणार नाही. मात्र सलमानच्या या स्टॅण्डला शोच्या निर्मात्यांनीच तडा दिला असून, स्वामी ओमला फिनालेमध्ये सहभागी करून घेण्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे संतप्त झालेल्या सलमान खानने फिनालेला बायकॉट करण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर पुन्हा बिग बॉस या शोचा होस्ट होणार नसल्याचेही त्याने संकेत दिले आहेत. आता सलमानची मर्जी राखण्यासाठी शोचे निर्माते स्वामी ओमला फिनालेपासून दूर ठेवणार की त्यांना एंट्री देणार हे बघणे मजेशीर ठरेल.
दरम्यान जेव्हा स्वामी ओमची घराबाहेर हकालपट्टी करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी सलमान खान याच्यासह बिग बॉस शोच्या निर्मार्त्यांवर आरोपांची बरसात केली होती. त्याचबरोबर फिनालेमध्ये सहभागी होऊ न दिल्यास बिग बॉसच्या घराला आग लावून देणार असल्याची धमकी दिली होती. वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवरील टॉक शो कार्यक्रमांमध्ये जणू काही त्यांनी बिग बॉस शोला बदनाम करण्याचा विडाच उचलला होता.
अशातही निर्मात्यांनी स्वामी ओमला फिनालेचे तिकिट दिल्याने हा सर्व टीआरपीचा तर खेळ नसावा ना असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. परंतु काहीही असो स्वामी ओम फिनालेमध्ये सहभागी झाल्यास पुन्हा काही तरी नाट्य घडणार अशी शंका प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाली नसेल तरच नवल.