Bigg Boss:11 स्मशानात साधना करणाऱ्या अघोरी तांत्रिक शिवानी दुर्गाची होणार एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 08:43 AM2017-09-28T08:43:34+5:302017-09-28T14:13:34+5:30
cnxoldfiles/a> या शोमधील नेमके कंटेस्टंट कोण हे अद्याप समोर आलेले नाही. पण एका टिझरमध्ये चार कॉमनर्सची नावे समोर आली ...
cnxo ldfiles/a> या शोमधील नेमके कंटेस्टंट कोण हे अद्याप समोर आलेले नाही. पण एका टिझरमध्ये चार कॉमनर्सची नावे समोर आली आहेत. त्या नावांपैकी एक म्हणजे साध्वी शिवानी दुर्गा. विशेष म्हणजे या साध्वी अमेरिकेतून पीएचडी केल्यानंतर स्मशानात साधना करणाऱ्या अघोरी तांत्रिक आणि स्पिरिच्युअल गाइड बनल्या आहेत.एका न्युज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार शिवानी दुर्गा अघोर तंत्राबरोबर पश्चिमात्य देशांमधील गूढ तंत्र विक्का, वोडू, सोर्करी याच्याही साधिका आहेत. त्यांचे भक्त आणि अनुयायी जगातील अनेक देशांमध्ये आहेत. भारतीय आणि पाश्चिमात्य तंत्रातील समानतांमधून त्यांनी अनेक नवीन पद्धतींचा शोध लावला आहे. बिग बॉसमधील वाद, भांडणं, वाईट हरकती यामुळे शोचा होस्ट सलमान खान यानेही शो सोडण्याचा इशाराही दिला होता. याच पार्श्वबूमीवर बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये काय काय घडणार याची रसिकांनी उत्सुकता लागली आहे. मात्र यावेळी बिग बॉस सीझन-11मध्ये कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड इशाराच अभिनेता सलमान खानने दिला आहे. घरात होणारे छोटे मोठे वाद, भांडणं आपण समजू शकतो, मात्र घरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता किंवा गैरवर्तन बिल्कुल खपवून घेणारच नाही असा इशारा सलमान खानने शोच्या लॉन्चिंगच्या वेळी दिला आहे. दरवेळी होणारी टोकाची भांडणं, वादविवाद आणि वाईट हरकती टाळण्यासाठी यावेळी बिग बॉसमध्ये काही कठोर नियम असतील असे संकेतही सलमानने दिले आहेत. बिग बॉसच्या सीझन-10मध्ये घरातील स्पर्धक स्वामी ओमच्या ऑन कॅमेरा हरकतींमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला होता की सलमान आणि स्वामी ओम यांचीही तू-तू-मैं-मैं झाली होती. बिग बॉस-10 हा शो संपल्यानंतरही विविध वाहिन्यांवरुन स्वामी ओमनी सलमान आणि बिग बॉस शो आणि संबंधित वाहिनीबाबत ब-याच गोष्टी उघडपणे व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे याची पुनरावृत्ती बिग बॉस सीझन-11मध्ये होऊ नये याची खबरदारी खुद्द सलमानने घ्यायचं ठरवलं आहे असंच यावरुन दिसतं आहे.