Bigg Boss 11:या कारणामुळे हरियाणवी सिंगर सपना चौधरीला सोडायचाय शो!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 10:12 AM2017-10-04T10:12:00+5:302017-10-04T15:42:00+5:30
बिग बॉसच्या पहिल्याच एपिसोडमध्ये कंटेस्टंट जुबैर खान बरोबर सपना चौधरी चा वाद झाला होता. त्याच्याकडे सपनाने आपल्याला बिग बॉसच्या ...
ब ग बॉसच्या पहिल्याच एपिसोडमध्ये कंटेस्टंट जुबैर खान बरोबर सपना चौधरीचा वाद झाला होता. त्याच्याकडे सपनाने आपल्याला बिग बॉसच्या घरात राहायचं नाहीय. या घरातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आत्ताच बिग बॉसला सुरूवात झाली आहे. अजून कंटेस्टंट एकमेकांना पूर्णपणे ओळखही झालेली नाहीय.पहिला आठवडाही पूर्ण झालेला नाही.त्यात आता सपना चौधरीला या घरातच राहण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले आहे.सपना चौधरी मोठ्या आत्मविश्वासाने या घरात एंट्री केली होती. ''मै खूद ही आफत हुँ'' असा स्वतःविषयी ओळख सपनाने करून दिली होती.त्यावेळी सलमान खानलाही सपनाचा हा बिनधास्तपणा आवडला होता.सपना ही एक स्ट्राँग कंटेस्टंट म्हणून पाहिली जात होते. मात्र आता अचानक सपनाला काय झाले की तिला या शो मध्येच राहायचे नाहीय.लवकरच या गोष्टीचाही उलगडा होईल.प्रत्येक कंटेस्टंटला त्याच्या लोकप्रियतेनुसार या घरात आणले गेल आहे.मात्र तिला या घरात आणल्याचा नेमका उद्देश काय आहे हेच समजलेले नाही.त्यामुळे या घरात राहण्यासाठी तिच्याकडे असे काही खास उद्देश नसल्याचे तिने जुबैरला सांगितले.त्यावर जुबैरने सपनाला समजवत सांगितले की, स्वतःला कमी लेखु नकोस.प्रत्येकाकडे नेगिटीव्ह आणि पॉझिटीव्ह पॉईंट असतात. तसेच परिस्थिती कशीही कितीही कठोर समस्यांना सामना करावा लागेल, त्या आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे.सपनाला घरात ज्या काही गोष्टी घडत आहेत.त्या गोष्टी तिला आवडत नसल्यामुळे जास्त दिवस या घरात राहणे शक्य नसल्याचे तिने म्हटले आहे.
Also Read:Bigg Boss 11: Day1: हसिना पारकरच्या जावयाची पहिल्याच दिवशी दादागिरी,म्हणाला मीच आहे TRP
सपना प्रचंड प्रसिद्ध असली तरी ती आजही स्वतःला एक सामान्य मुलगीच समजते. सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली. या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या. तिच्या बहिणीचे लग्न करून दिले.सपनाच्या सॉलिड बॉडी या पहिल्याच गाण्याने युट्युबला धुमाकूळ घातला होता. तिच्या पहिल्याच गाण्यामुळे ती फेमस झाली. आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की, एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कधीही पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते.