Bigg Boss 11: चे हे लव्ह बर्ड्स असा सेलिब्रेट करणार 'व्हॅलेंटाइन डे'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 11:22 AM2018-01-25T11:22:07+5:302018-01-25T16:52:07+5:30

प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं अन् आमचं सेम असतं... हेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेन्टाईन डे... प्रेमाचा जणू ...

Bigg Boss 11: Celebrate 'Love Birds' as 'Valentine's Day' | Bigg Boss 11: चे हे लव्ह बर्ड्स असा सेलिब्रेट करणार 'व्हॅलेंटाइन डे'

Bigg Boss 11: चे हे लव्ह बर्ड्स असा सेलिब्रेट करणार 'व्हॅलेंटाइन डे'

googlenewsNext
रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं अन् आमचं सेम असतं... हेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेन्टाईन डे... प्रेमाचा जणू उत्सवच... मग या उत्सवाचं सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं..त्यामुळेच बिग बॉसच्या या एक्स कंटेस्टंटनला प्रेमाचं नाव काढलं की तिला हसू रोखणं कठीण झालंय... मात्र या हसण्या मागे दडलंय एक खास गुपित ते म्हणजे पुनिश शर्मा आणि बंदगी कालरा व्हॅलेंटाइन डेची प्लानिंग करत आहेत.पुनीशने बंदगीसाठी एक खास प्लॅनिंग केले आहे ते म्हणजे दोघेही या दिवशी बालीमध्ये आपला पहिला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार आहेत.तसेच फेब्रुवारीमध्ये पुनिशचा बर्थ डेही आहे.त्यामुळे डबल सेलिब्रेशनच्या निमित्ताने त्यांनी बाली जाण्याचा निश्चित केले आहे.बिग बॉसच्या घरातच या दोघांचे अफेयर सुरु झाले होते. येवढेच नाही तर हे दोघे बिग बॉसच्या घरात इंटीमेट होतानाही दिसले.घरातून बाहेर आल्यानंतर दोघांनी रिलेशन कायम ठेवले आहेत. अलीकडेच दोघे दिल्लीच्या एका क्लबमध्ये पार्टी करताना स्पॉट झाले.पार्टीमध्ये बंदगी ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली.'बिग बॉस 11'चा कंटेस्टेंट पुनीश विवाहीत आहे. तो बिग बॉसच्या घरात होता त्यावेळी त्याचे लग्नाचे फोटोज व्हायरल झाले होते.तरीही त्याचे बंदगीसोबतचे अफेयर सुरुच होते.बिग बॉसच्या घरात पुनीश आणि बंदगीचे अफेयर सर्वात जास्त चर्चेत राहिले. दोघांच्या अफेयरवर फक्त घरातील लोकांचीच नाही तर सलमान खानचीही नजर होती. सलमानने दोघांना चुकीच्या वर्तवणुकीमुळे वॉर्निंग दिली होती.तसेच ग्रॅण्ड फिनाले दरम्यानही धमाकेदार परफॉर्मन्सही सादर केला होता त्यावेळी दोघांचीही हॉट केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.(Also Read:बिग बॉसच्या घराबाहेर पडताच बंदगी कालराने शेअर केला टॉपलेस फोटो!!)

बिग बॉस 11 सिझनमध्ये पुनिश आणि बंदगी यांचे प्रेमप्रकरण प्रेक्षकासह इतरांनाही डोकेदुखी ठरला होता. दोघेही एका बेडवर रोमान्स करताना बघावयास मिळाले होते.त्यानंतर एका व्हिडीओमध्ये पुनीश चक्क बंदगीला कपडे काढण्यासाठी सांगताना दिसत आहे.एवढेच काय तर दोघे वॉश रूममध्ये टाइम स्पेंट करतानाही दिसले होते.नॅशनल टीव्हीवर ‘मुलगी बंदगीचा हा सर्व तमाशा बघून तिच्या वडिलांची तब्येतही बिघडली होती.इतकेच नाही तर बंदगी आणि पुनीशचे हे कारनामे बंदगीच्या घरमालकानेही तिला घर सोडून जाण्यासा सांगितले होते.

Web Title: Bigg Boss 11: Celebrate 'Love Birds' as 'Valentine's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.