Bigg Boss 11 : गोळा केलेले कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात गेली हिना खान; डिझायनरचा आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 11:30 AM2017-12-17T11:30:00+5:302017-12-17T17:00:49+5:30

बिग बॉसच्या घरात स्टाइल आयकॉन म्हणून ओळख असलेल्या हिना खानबद्दल एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे, वाचा सविस्तर!

Bigg Boss 11: Gone Hina Khan went to Bigg Boss house; Designer accusation! | Bigg Boss 11 : गोळा केलेले कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात गेली हिना खान; डिझायनरचा आरोप!

Bigg Boss 11 : गोळा केलेले कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात गेली हिना खान; डिझायनरचा आरोप!

googlenewsNext
व्हीवरील बिग बॉसच्या सीजन ११ मधील सर्वाधिक स्टायलिश स्पर्धक म्हणून ओळखली जाणारी टीव्ही अभिनेत्री हिना खानबद्दल एक धक्कादायक खुलासा समोर येत आहे. होय, दर दिवसाला नव्या आउटफिटमध्ये दिसणारी अन् बिग बॉसच्या घरात स्टाइल आयकॉन बनलेल्या हिना खानवर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. घरात हिना जे कपडे परिधान करून स्वत:ला मिरविते, ते कपडे तिने डिझायनरकडून गोळा केले आहेत. डिझायनरच्या मते, हिना खान बिग बॉसच्या घरात जे कपडे घालून स्वत:ला मिरवित आहे, ते तिने डिझायनरकडून गोळा केलेले आहेत. 





टीव्ही मालिकेसाठी कपडे डिझाइन करणाºया नीरूशा निखतने ट्विटच्या माध्यमातून हिना खानच्या स्टाइल स्टेटमेंटवर काही प्रश्न उपस्थित केले. काही दिवसांपूर्वीच घरात एंट्री केलेल्या रोहन मेहराने हिना खानला स्टाइल आयकॉन म्हटले होते. त्याला उत्तर देताना नीरूशाने लिहिले की, ‘प्रिय रोहन, हिना खान आणि स्टाइल आयकॉन? १५० नाइट सूट, ५० शूजच्या जोड्या १०० ड्रेसेज वाह... गोळा करून तर कोणीही आयकॉन बनू शकतो. नशीब... मी तिला माझे कपडे दिले नाहीत. मला आयुष्यभर याची खंत असेल. 



काही दिवसांपूर्वीच रोहन मेहरा बिग बॉसच्या घरात गेला होता. यावेळी त्याच्या आॅनस्क्रीन आई हिना खानचे कौतुक करताना त्याने म्हटले होते की, ‘तू स्टाइल आयकॉन बनली आहे.’ हिच बाब नीरूशाला खटकल्याने त्यांनी तिची पोलखोल केली. यावेळी नीरुशाने हिना खानच्या स्टायलिशचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला. ज्यामध्ये ती हिना खानसाठी कपडे मागत आहे. या स्क्रीनशॉटनुसार हिना खानने शोमध्ये एंट्री करण्याअगोदर तिच्या स्टायलिस्टने अनेक डिझायनर्सला मॅसेजेस् करून परत देण्याच्या बोलीवर कपड्यांची मागणी केली. हा मॅसेज नीरूशालादेखील आला होता. मात्र तिने कपडे देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. 
 

असो, नीरूशाच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे सांगणे मुश्किल असले तरी, हिना खानची स्टायलिस्ट हेमलता परिवाल दररोज तिने परिधान केलेल्या आउटफिट्सचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत असते. दररोज हिना कोणत्या डिझायनरचे ड्रेस आणि ज्वेलरी परिधान करते त्याची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना देत असते. हिंना खानला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली आहे. 

Web Title: Bigg Boss 11: Gone Hina Khan went to Bigg Boss house; Designer accusation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.