Bigg Boss 12:पुन्हा झाले पॅचअप, अनुप जलोटा यांनी जसलीनला गुलाब देत म्हटले LOVE YOU पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 02:57 PM2018-10-05T14:57:25+5:302018-10-05T15:00:47+5:30
काही दिवसांपासून दुखावलेली जसलीनला मात्र आता खूप चांगले सरप्राईजच मिळाल्याचे तुम्हालाही जाणवल्याशिवाय राहाणार नाही.
गेल्या आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटी स्पर्धक भजनसम्राट अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या ब्रेकअपमुळे घरातले वातावरण अगदी बदलले होते. मात्र आता या दोघांमध्ये जास्त दिवस हा दुरावा राहिलेला नाही. पुन्हा एकदा या लव्हबर्डना एकत्र आणण्याचा बिग बॉसने निर्धारच केला होता. अगदी त्यानुसार आता एकमेकांपासून दुरावलेल्या या लव्हबर्डला पुन्हा एकत्र आणले आहे. काही दिवसांपासून दुखावलेली जसलीनला मात्र आता खूप चांगले सरप्राईजच मिळाल्याचे तुम्हालाही जाणवल्याशिवाय राहाणार नाही.
बिग बॉसच्या घरात प्रत्येक सिझनमध्ये अशा रोमँटीक जोड्यांना आपापल्या प्रियकराबरोबर डेटवर जाण्याची संधी दिली जाते. अगदी त्याचप्रमाणे यंदाच्या सिझनमध्येही घडले. अनुप जलोटा आणि जसलीन दोघांनाही एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंड करण्याची संधी दिली जाते. आणि हिच संधी साधत अनुप पुन्हा आपल्या प्रेयसीवर लट्टु होत, सगळे रूसवे फुगवे विसरत जसलीनला प्रपोज करतात. हा रोमँटीक ड्रामा आता किपतपत बिग बॉस शोला टीआरपीच्या रेसमध्ये स्थान मिळवून देणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
या कारणामुळे अनूप जलोटा व जसलीन मथारूचे झाले होते ब्रेकअप!
नॉमिनेशन टास्कमध्ये एक सिंगल कंटेस्टंट कुण्या एका जोडीदाराला जायबंदी करणार होता. त्याला सोडवण्यासाठी त्याच्या जोडीदाराला सिंगल कंटेस्टंट सांगेल त्या वस्तूचा त्याग करणे बंधनकारक होते. या टास्कमध्ये दीपिका कक्कडने अनूप जलोटा यांनी बंदी बनवले. यानंतर दीपिकाने अनूप यांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांची जोडीदार जसलीनला तिचे सगळे कपडे, मेकअप त्याग करण्यास तसेच केस कापण्यास सांगितले. आधी जसलीनने हे सगळे करण्यास होकार दिला. नंतर नंतर ती पलटली. एक कलाकार या नात्याने कपडे किती महत्त्वाचे आहेत, हे तिने दीपिकाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण दीपिका आपल्या म्हणण्यावर ठाम होती. अखेर जसलीनने कपड्यांचा त्याग करण्यास व केस कापण्यास नकार दिला. हीच गोष्ट अनूप यांच्या मनाला लागली. यानंतर अनुप जलोटा यांनी जसलीन सोबतचे आपले नाते आता पुर्वीसाररखे नसल्याचे सांगत ब्रेकअप केले होते.