Bigg Boss 12 : अनुप जलोटा यांच्याआधी या सिंगरला डेट करत होती जसलीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 17:02 IST2018-10-22T17:00:59+5:302018-10-22T17:02:01+5:30
बिग बॉसच्या घरात जसलीनला घेऊन तिच्या पूर्वीच्या प्रियकराबाबतचा खुलासा झाला आहे.

Bigg Boss 12 : अनुप जलोटा यांच्याआधी या सिंगरला डेट करत होती जसलीन
सध्या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस १२ चांगलाच चर्चेत आहे. विचित्र जोडींसोबत सुरू झालेल्या ह्या सीझनमध्ये यावेळेस खूप काही पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये जास्त चर्चा भजन सम्राट अनुप जलोटा व त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारूची होत आहे. जसलीन अनुपपेक्षा ३७ वर्षे लहान आहे. ते दोघे बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत आहेत. बिग बॉसच्या घरात जसलीनला घेऊन तिचा पूर्वीच्या प्रियकराबाबतचा खुलासा झाला आहे. जे ऐकून प्रेक्षक हैराण होतील.
बिग बॉसच्या घरात एक टास्क देण्यात आले होते. ज्यात सर्व स्पर्धकांना आपल्या खासगी आयुष्यातील सीक्रेट सांगायचे होते. त्यावेळी जसलीन मथारूने सांगितले की अनुप जलोटा यांच्याआधी बॉलिवूड गायक सुखविंदर सिंग यांना डेट केले आहे. हे ऐकल्यावर घरातील सर्व स्पर्धक हैराण झाले. जसलीन सुखविंदर पेक्षा १९ वर्षे लहान आहे. याबाबत जसलीनने कधी सुखविंदर यांना सांगितले नव्हते. जसलीनने आपले सीक्रेट सांगितले त्यावेळी अनुप जलोटा अजिबात हैराण झाले नाहीत. याउलट त्यांनी सांगितले की, जसलीन आणि सुखविंदर यांच्या नात्याबद्दल मला आधीपासून माहित होते. याबाबत अनुप यांनी सांगितले की, ही गोष्ट जसलीनच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले. पण, मी कधी जसलीनला सांगितले नाही.
जसलीन मथारू यांच्याव्यतिरिक्त या शोमधील इतर सदस्यांनीदेखील आपल्या आयुष्यातील सीक्रेट सांगितले.