'बिग बॉस 12' ची स्पर्धक लवकरच करणार अभिनत्र क्षेत्रात पदार्पण, या बड्या प्रोजेक्टमध्ये असणार भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 13:50 IST2019-07-27T13:46:47+5:302019-07-27T13:50:59+5:30
दीपक ठाकुरच्या म्युझिक व्हिडीओमध्ये रोमान्स करताना दिसली होती. या रोमँटीक व्हिडीओतील दीपक आणि सोमीची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.

'बिग बॉस 12' ची स्पर्धक लवकरच करणार अभिनत्र क्षेत्रात पदार्पण, या बड्या प्रोजेक्टमध्ये असणार भूमिका
कुणाचंही नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कामाचा बडा प्रोजेक्ट हाती लागला तर सोने पे सुहागाच. हेच घडलं आहे बिग बॉस 12 या रिअॅलिटी शोची स्पर्धक सोमी खान हिच्याबाबत. सोमी लवकरच अभिनय क्षेत्रात आपले पाऊल ठेणार आहे. नेटफ्लिक्सची वेब सीरीज 'न्याय- द जस्टिस' कॉल मधून ती अक्टिंग डेब्यू करणार आहे.
एका महत्त्वपूर्ण भूमिकेत सोमी रसिकांना पाहायला मिळेल. या वेबसिरीजच्या शूटिंगला सुरूवात झाली असून आपल्या पहिल्या प्रोजेक्टसाठी सोमी खूप एक्सायटेड आहे. या वेबसिरिजमध्ये सोमी व्यतिरिक्त शक्ति कपूर, जया प्रदा, अमर उपाध्याय आणि किंशुक महाजन यांच्याही भूमिका आहेत. यावर सोमीने अजूनतरी कोणत्याही प्रकारेच स्पष्टीकरण दिले नसून या प्रोजेक्टविषयी बोलण्यासाठी तिने मौन बाळगले आहे.
याआधी ती दीपक ठाकुरच्या म्युझिक व्हिडीओमध्ये रोमान्स करताना दिसली होती. या रोमँटीक व्हिडीओतील दीपक आणि सोमीची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. सोमी सध्या नव्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतआ हे. आपल्या फिटनेसवरही ती लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. बिग बॉसमुळे सोमीला बरीच लोकप्रियता लाभली आहे. तसेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला.
ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. तसेच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. शेअर केलेल्या या फोटोत सोमीचा ग्लॅमरस आणि तितकाच मॉडर्नअंदाज पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या फोटोंवर तिचे मित्र-मैत्रिणी आणि फॅन्सकडून कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतो. विशेष म्हणजे सोशल मीडियावर तिला प्रचंड फॉलोव्हर्स आहेत.