Bigg Boss 12: यंदाच्या सिझनमध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री करणार दमदार एंट्री, तर हे 19 कलाकार होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 11:50 IST2018-09-01T11:49:10+5:302018-09-01T11:50:07+5:30
एकुण 19 स्पर्धक सेलिब्रेटींची नावे समोर आली आहेत.तसेच 'बिग बॉस 12'चे लाँचिंग हे लोणावळ्यात नाहीतर गोव्यात होणार आहे.तसेच 16 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

Bigg Boss 12: यंदाच्या सिझनमध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री करणार दमदार एंट्री, तर हे 19 कलाकार होणार सहभागी
छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉसचे 12' सिझन लवकरच सुरू होणार आहे. सगळ्यात वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस' या शोकडे पाहिले जाते. स्पर्धकांचं वागणं,शोमधील अश्लीलता यावरुन या शोची कायमच चर्चा झाली. त्यामुळे प्रत्येक सिझनला कोणते सेलिब्रेटी या घरात एंट्री घेणार याचीही उत्सुकता पाहायला मिळते. नेहमीप्रमाणे यावेळी बिग बॉसचा 12 सिझनमध्ये अनेक सेलिब्रेटींच्या नावाची चर्चा सुरू आहे. एकुण 19 स्पर्धक सेलिब्रेटींची नावे समोर आली आहेत. यापैकी एक असणार मराठमोळी नेहा पेंडसे. नेहाने मराठी आणि हिंदी सिनेमा असो किंवा मालिका आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
'मे आय कम इन मॅडम' या हिंदी मालिकेमुळे तर नेहा घराघरात पोहचली होती.विशेष म्हणजे या मालिकेत नेहाने साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. आपल्या सहका-यांशी बिनधास्त फ्लर्ट करणारी बॉस रसिकांना चांगलीच भावली होती. मालिकेत आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाजात रसिकांना घायाळ करणारी नेहा प्रत्यक्ष जीवनातही आपल्या मादक अदांची जादू दाखवत असते. बहुदा हीच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी निर्मात्यांनी बिग बॉससाठी नेहा पेंडसेचीही निवड केली आहे.
नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटोमुळे कायमच चर्चेत असते.त्यामुळे 'बिग बॉसच्या 12' व्या सिझनमध्ये ती काय धुमाकुळ घालणार हेही पाहणे रंजक ठरणार आहे. तसेच या सिझनमध्ये देवोलिना भट्टाचार्य, सृष्टी रोडे, विभा छिब्बर,रिद्धीमा पंडीत,मिलिंद सोमण पत्नी अंकिता कुंवर,दिव्या अगरवाल,स्कारलेट मीरोज,शुभी जोशी,शालीन भनोट,शोएब-दिपिका,गुरमीत-देबीना,पम्मी आंटी फेम सुमेर एस परिछा, महिका शर्मा बॉयफ्रेंड डेनी डी,परम सिंह यांची स्पर्धक म्हणून एंट्री होणार आहे.सुरूवातीपासूनच हा सिझन थोडा हटके असणार आहे. कारण यावेळी लाँचिंग हे लोणावळ्यात नाहीतर गोव्यात होणार आहे.तसेच 16 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
शिल्पा शिंदेने 'बिग बॉस-11'चं विजेतेपद पटकावलं होते. प्रतिस्पर्धी स्पर्धक हिना खान हिच्यावर मात करत 'बिग बॉस-11' चे जेतेपद आपल्या नावावर केले होते. 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभी या भूमिकेमुळे शिल्पा शिंदे घराघरात पोहचलीच होती.