Bigg boss 12 : टास्करमुळे बिग बॉसच्या घरात रंगला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 06:25 PM2018-10-09T18:25:56+5:302018-10-09T22:30:00+5:30
राग, नैराश्य आणि तक्रारींचा सामना करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज जेल ब्रेकचे टास्क सुरूच राहिले. या गंभीर टास्कमुळे स्पर्धकांमध्ये एक लढाऊ भावना निर्माण झाली. या टास्क दरम्यान देखील काहींनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
बिग बॉस हाऊसमधील स्पर्धकांमध्ये सध्या प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. राग, नैराश्य आणि तक्रारींचा सामना करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज जेल ब्रेकचे टास्क सुरूच राहिले. या टास्क दरम्यान श्रीसंत आणि सोमी यांना तुरुंगात टाकण्यात आले होते आणि रोमिल आणि करणवीर हे त्यांचे रक्षण करत होते. फायद्यासाठी श्रीसंत सोमीला कर्णधार म्हणून संधी देणार की या पदासाठी स्वतः लढणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. यावरून घरात चांगलीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.
या गंभीर टास्कमुळे स्पर्धकांमध्ये एक लढाऊ भावना निर्माण झाली. या टास्क दरम्यान देखील काहींनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यातच बिग बॉसने प्रतिस्पर्धींना इशारा दिला आणि त्यांना हिंदीपेक्षा इतर भाषेतून बोलण्यास परावृत्त करण्यास सांगितले. त्यानंतर श्रीसंत आणि करणवीर यांनी इंग्रजी भाषेचा उपयोग केला. यावरून श्रीसंत, करणवीर आणि दीपक यांच्यात शाब्दिक वादही झाला. पूर्वीच्या वादविवादात सहभागी नसलेला एक स्पर्धक देखील या वादात उतरला. सुरभी देखील या वादात सहभागी झाली आणि त्यामुळे हा वाद चांगलाच वाढला.
या वादानंतर सर्वजण रात्री झोपले आणि नव्या दिवसाची सुरुवात 'अल्लाह दुहाई है' या गाण्याने करण्यात आली. या गाण्याने सर्वांना एक प्रकारची उर्जा मिळाली. त्यानंतर जेल ब्रेक टास्कचा दुसरा भाग घोषित करण्यात आला, ज्याने स्पर्धकांची भूमिका बदलली गेली. कैदी पोलिस बनले तर पोलिस कैदी... आणि त्यानुसार श्रीसंत, नेहा, जसलीन, दीपक, सुरभी, सौरभ आणि सोमी, करणवीर, दीपिका, श्रृष्टी, सबा, रोमिल, शिवाशिश आणि उर्वशी हे पोलीस बनले. या फेरीतही स्पर्धकांमध्ये खूप आक्रमकपणा दिसून आला. सुरभीने सृष्टीला खाली खेचण्याचा प्रयत्न केला तर भिंत पार करत असताना शिवाशिश दिपककडे वळला.
कर्णधारपदाच्या टास्कमध्ये कोण लढाई करेल आणि कोण जागा बनवेल? स्पर्धकांमधील शत्रुत्व वाढेल की मैत्री फुलेल? हे बिग बॉसच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.