संतापला श्रीसंतचा चाहता; ‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्करला दिली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 13:29 IST2019-01-06T13:26:01+5:302019-01-06T13:29:23+5:30

‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्कर हिने एकीकडे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करतेय, दुसरीकडे अनेकजण तिच्या या विजयावर नाराज आहेत. या नाराज असलेल्यांमध्ये माजी क्रिकेटपटू श्रीसंतच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. श्रीसंतच्या एका चाहत्याने तर दीपिकावर अ‍ॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली आहे. 

Bigg Boss 12 Sreesanth Fans Threatens Dipika Kakar Of Acid Attack | संतापला श्रीसंतचा चाहता; ‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्करला दिली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी!

संतापला श्रीसंतचा चाहता; ‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्करला दिली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी!

ठळक मुद्देश्रीसंत हा ‘बिग बॉस 12’च्या विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याच्या चाहत्यांनाही श्रीसंतच ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकेल, असे वाटत होते. पण श्रीसंतला मागे टाकत दीपिकाने ट्रॉफी जिंकली आणि श्रीसंतचे चाहते बिथरले.

बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्कर हिने एकीकडे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करतेय, दुसरीकडे अनेकजण तिच्या या विजयावर नाराज आहेत. या नाराज असलेल्यांमध्ये माजी क्रिकेटपटू श्रीसंतच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. श्रीसंतच्या एका चाहत्याने तर दीपिकावर अ‍ॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली आहे. 
स्वत:ला श्रीसंतचा चाहता सांगणा-या एका युजरने ही धमकी दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये या युजरने दीपिकासाठी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. तू कुठेही दिस, अ‍ॅसिड फेकून तुला मारेल, असे या युजरने लिहिले आहे.




दीपिकाच्या एका चाहत्याची नजर या युजरच्या धमकी भरलेल्या ट्वीटवर पडली अन त्याने लगेच याबद्दल मुंबई पोलिसांना सूचित केले. मुंबई पोलिसांनीही लगेच या तक्रारीची दखल घेतली. Dipika Kakar™💫BB12 Winner🏆 या नावाने चालवण्यात येत असलेल्या दीपिकाच्या फॅन पेजवर ट्वीट करत, या प्रकरणात लक्ष घालण्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.




श्रीसंत हा ‘बिग बॉस 12’च्या विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याच्या चाहत्यांनाही श्रीसंतच ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकेल, असे वाटत होते. पण श्रीसंतला मागे टाकत दीपिकाने ट्रॉफी जिंकली आणि श्रीसंतचे चाहते बिथरले. अलीकडे एका मुलाखतीत बोलताना खुद्द श्रीसंतनेही याची कबुली दिली. मी विनर न बनल्याने माझे चाहते निररश आहेत. अनेक लोक रडले, एका चाहत्याने तर हाताची नस कापून घेतल्याचे मला कळले. मी अनेकांना निराश केले. मी त्या सगळ्यांची माफी मागतो. मी चाहत्यांना सांगू इच्छितो की, मी ‘रियल विनर’ आहे. ‘बिग बॉस 12’चाच नाही तर रिअल लाईफचाही, असे श्रीसंत म्हणाला होता.

Web Title: Bigg Boss 12 Sreesanth Fans Threatens Dipika Kakar Of Acid Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.