Bigg Boss 12: असा रंगला पोलीस आणि कैद्यांचा सामना,कोण कुणावर ठरला वरचढ? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 22:30 IST2018-10-08T21:54:18+5:302018-10-08T22:30:00+5:30
याच कार्याचा या आठवड्यातील कॅप्टन निवडीवर परिणाम होणार आहे. या कार्यानुसार बिग बॉसच्या घरात पोलीस आणि कैद्यांचा खेळ रंगला.

Bigg Boss 12: असा रंगला पोलीस आणि कैद्यांचा सामना,कोण कुणावर ठरला वरचढ? जाणून घ्या
भजनसम्राट अनुप जलोटा बिग बॉसच्या घरातून आश्चर्यकारकरित्या एलिमिनेट झाल्यानंतर घरातील सदस्यांना धक्का बसला. यानंतरएक रस्ता, दो राही या गाण्याने दुसऱ्या दिवसाची सुरुवात होताच हा दिवस कसा जाणार याची कल्पना बिग बॉसनं सदस्यांना करुन दिली. यावेळी नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने ट्विस्ट आणला आणि सारेच चकीत झाले. यावेळी लक्झरी बजेट कार्याला बिग बॉसने जेल ब्रेक असं नाव देऊन धक्काच दिला. याच कार्याचा या आठवड्यातील कॅप्टन निवडीवर परिणाम होणार आहे. या कार्यानुसार बिग बॉसच्या घरात पोलीस आणि कैद्यांचा खेळ रंगला.
पोलीस आणि कैदी असे दोन गट पाडण्यात आले होते. श्रीसंत, नेहा, जसलीन, दीपक, सुरभी, सौरभ आणि सोमी हे कैदी असणार आहेत. तर करणवीर, दीपिका, सृष्टी, सबा, शिवाशिश, रोमिल, ऊर्वशी हे पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. यावेळी बझर वाजताच कैदी जेलमधून पळण्याचा प्रयत्न करतात तर दोन पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात.
यावेळी भिंत तोडून, उड्या मारुन कैदी पळण्याचा प्रयत्न करताना पाहयला मिळाले. यांत सगळ्यात शेवटी राहणारा कैदी या टास्कमधून बाहेर पडणार असे सांगण्यात आले होते. मोठ्या चुरशीने हा टास्क खेळला गेला. यावेळी नेहमीप्रमाणे घरातील काही सदस्यांमध्ये हमरीतुमरी झाली. रोमिल-दीपिका आणि करणवीर-सुरभी हे एकमेकांसोबत भिडल्याचे पाहायला मिळाले. तर अनुप जलोटा यांच्याबाबतही घरातील सदस्यांना मोठा धक्का आठवड्याच्या शेवटी पचवावा लागणार आहे. जलोटा यांच्या एलिमिनेशननंतर जसलीनमध्ये कसा बदल झाला हेही साऱ्यांना चक्राऊन सोडेल यांत शंका नाही.
बिग बॉसच्या घरातील हे सिक्रेट्स पहिल्यांदाच जगासमोर, शो मध्येच सोडल्यास द्यावा लागेल २ कोटींचा दंड
बिग बॉसच्या घरात राहणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस घरातील सदस्यांसाठी जणू अग्निपरीक्षाच असते. इथले टास्क आणि वादावादी याला कंटाळून घरातील सदस्य वारंवार घर सोडून जाण्याच्या वल्गना करतात. याआधीच्या प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धकानं अशी धमकी दिलीच आहे. मात्र कोणताही स्पर्धक घर सोडण्याची हिंमत करत नाही. कारण बिग बॉसचा शो अर्धवट सोडणं कुणालाही परवडण्यासारखं नाही. हा शो मध्येच सोडल्यास घरातील सदस्याला त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागू शकते. बिग बॉसमध्ये येण्याआधी स्पर्धक आणि वाहिनीमध्ये एक करार झालेला असतो. या करारानुसार शो मध्येच सोडल्यास २ कोटींचा दंड संबंधित स्पर्धकाला द्यावा लागू शकतो. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक असलेल्या नितीभाने ही बाब सांगितली आहे.