Bigg Boss 13 : हॉस्पिटल टास्कमध्ये ओलांडल्या मर्यादा, सिद्धार्थ-रश्मी व आरतीला केलं जबरदस्त टॉर्चर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 02:39 PM2019-10-03T14:39:03+5:302019-10-03T14:40:14+5:30
बिग बॉसचा तेरावा सीझनमधील स्पर्धकांना घरात काही दिवस झाले असताना टास्कमध्ये जबरदस्त टॉर्चर करताना पहायला मिळालं.
बिग बॉसचा तेरावा सीझनमधील स्पर्धकांना घरात काही दिवस झाले नाही आणि टास्कमध्ये जबरदस्त टॉर्चर करताना पहायला मिळत आहे. बिग बॉसने सगळ्यांना पहिले साप्ताहिक कार्य दिलं. या टास्कला नाव दिलं होतं बिग बॉस हॉस्पिटल. बिग बॉसचा हा डेंजरस टास्क स्पर्धकांना भारी पडला. टास्कच्या सुरूवात करण्याआधीच आसिम रिआजने हार मानली तर महिला कंटेस्टंट राग काढताना पहायला मिळाल्या.
टास्क दरम्यान आरती सिंग त्यावेळी रडू लागली जेव्हा शेफाली बग्गा हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायला सुरूवात केली. शेफालीने आरती व सिद्धार्थ शुक्लाच्या अफेयर बद्दल बोलायला लागली. शेफाली म्हणाली की, काय झाल होतं सिद्धार्थ व आरतीमध्ये? सिद्धार्थ आणि तुझ्या लव्ह स्टोरीचं काय झालं होतं? सांगून टाक जगाला जाणून घ्यायचं आहे. यासोबतच शेफाली व्हिडिओमध्ये आरतीच्या घटस्फोटाबद्दलदेखील विचारते आहे. तर शहनाज तिच्या चेहऱ्याला घेऊन कमेेंट्स करताना दिसत आहे.
बिग बॉस हॉस्पिटल टास्कमध्ये आरती सिंग शेफालीच्या गोष्टी ऐकून रडू लागली. तर शेफाली बग्गाच्या गोष्टी ऐकून बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकही हैराण झाले. आरतीनंतर शेफाली व शहनाजने रश्मी देसाईला टार्गेट करायला सुरूवात केली. शेफाली रश्मीला म्हणाली की, तू हिला रडताना पाहत राहणार आहेस का? तर शहनाज रश्मीला हरवण्यासाठी स्वतःला मारताना दिसली.
या टास्कदरम्यान सिद्धार्थ शुक्लाला टॉर्चर करत घरातील सर्व मर्यादा ओलांडल्या. सिद्धार्थचे वॅक्सिंग करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर शेण, माती व बऱ्याच गोष्टी टाकल्या. सिद्धार्थची अवस्था पाहून बाकी सदस्य हैराण झाले. सिद्धार्थला टॉर्चर दुसऱ्या टीम मेंबरमधील पारस छाबडाने केलं.
बिग बॉसच्या पुढच्या एपिसोडला सिद्धार्थची टीम पारसच्या टीमला टॉर्चर करणार आहे. यावेळी घरात सिद्धार्थ डे आणि असीम रियाजला अमीषा पटेलने ब्लॅक हार्ट दिलं होतं. त्यामुळे ते नॉमिनेशन प्रक्रियेपासून वाचले आहेत. त्यांच्याशिवाय माहिरा शर्मा व आरती सिंगही सुरक्षित आहे.
घरातून बेघर होण्यासाठी देवोलिना, रश्मी, शेफाली, कोएना व दलजीत नॉमिनेट झाले आहेत.