125 किलो वजनाचा झाला होता पारस छाब्रा; वजन घटवून केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:46 PM2023-08-04T12:46:10+5:302023-08-04T12:46:52+5:30

Paras chhabra: अलिकडेच पारसने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याने then and now हा फोटो पोस्ट केला आहे.

bigg-boss-13-fame-paras-chhabra transformation-shared-photos-of-weight-loss-journey | 125 किलो वजनाचा झाला होता पारस छाब्रा; वजन घटवून केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

125 किलो वजनाचा झाला होता पारस छाब्रा; वजन घटवून केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

googlenewsNext

'बिग बॉस 13' (bigg boss 13) च्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे पारस छाब्रा (Paras chhabra). टास्क खेळण्याच्या उत्तम पद्धतीसह पारस त्याच्या पर्सनालिटीमुळेही चर्चेत आला होता. गुड लुकिंग, चार्मिंग अशी ओळख असलेला पारस मध्यंतरी त्याच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आला होता. वाढलेल्या वजनामुळे त्याच्या हातून अनेक मोठे प्रोजेक्ट्सही गेले होते. त्यामुळे त्याने स्वत: वर मेहनत घेतली. विशेष म्हणजे पारसचं सध्या झालेलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.

अलिकडेच पारसने इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याने then and now हा फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या फोटोवर त्याचं कमालीचं ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे. पारसने १२५ वरुन थेट १०० किलो वजन केलं आहे. म्हणजे त्याने २५ किलो वजन घटवलं आहे.

“१२५ ते १०० किलो…आतापर्यंतचा वजन कमी करण्याचा अनुभव फार चांगला होता. आता मला पुढील ध्येय गाठण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. या संपूर्ण प्रवासात माझ्या फिटनेस ट्रेनरही माझे कौतुक केले. मानसिकता, जीवनशैली, आहारात बदल करून मी हा टप्पा गाठला आहे. भविष्यात आणखी फिट होण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन," असं पारसने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
 
दरम्यान, बिग बॉस १३ पूर्वी पारस स्पिल्ट्सव्हिलामध्ये दिसला होता. स्पिल्ट्सव्हिलाचं पाचवं पर्व त्याने जिंकलं होतं. तसंच तो काही म्युझिक अल्बममध्येही झळकला आहे.

Web Title: bigg-boss-13-fame-paras-chhabra transformation-shared-photos-of-weight-loss-journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.