Bigg Boss13 : अरहानची पोलखोल; चाहते म्हणाले, StayStrongRashamiDesai
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:44 AM2019-12-08T11:44:14+5:302019-12-08T11:45:12+5:30
सलमानने असा काही खुलासा केला की, ‘बिग बॉस 13’च्या घरातील स्पर्धकांनाच नाही तर चाहत्यांनाही जोरदार धक्का बसला.
‘बिग बॉस 13’मध्ये सध्या फुल्ल ऑन ड्रामा बघायला मिळतो आहे. असे असले तरी काल वीकेंडच्या डावमध्ये जे काही झाले ते पाहून अनेकांना धक्का बसला. होय, या एपिसोडमध्ये सलमानने असा काही खुलासा केला की, ‘बिग बॉस 13’च्या घरातील स्पर्धकांनाच नाही तर चाहत्यांनाही जोरदार धक्का बसला. सर्वाधिक धक्का बसला तो रश्मी देसाईला. सलमानने जे काही सांगितले त्यानंतर रश्मी अक्षरश: हुंदके देत रडू लागली. तिला त्या अवस्थेत बघून अखेर सलमान स्वत: ‘बिग बॉस’ घरात आला आणि त्याने रश्मीला सावरले.
सलमानने असा काय खुलासा केला, तर अरहानबद्दल. होय, रश्मीला ‘बिग बॉस 13’च्या घरात प्रपोज करणाºया अरहानची सलमानने पोलखोल केली. अरहान हा आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मुलही आहे, असा धक्कादायक खुलासा सलमानने केला. सलमानचे हे शब्द ऐकून रश्मीच्या पायाखालची जमीन सरकली. ती ढसाढसा रडू लागली. रश्मीची ही अवस्था बघून सलमान स्वत: बिग बॉसच्या घरात गेला आणि त्याने तिला जवळ घेत, धीर दिला.
रश्मीचे हे ब्रेकडाऊन बघून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. सोशल मीडियावरही याच्या प्रतिक्रिया उमटल्या. अरहानचा खोटेपणा जगापुढे आल्यानंतर अनेक चाहत्यांनी रश्मीला यास्थितीत खंबीर राहण्याचा सल्ला दिला.
काहीच वेळात #StayStrongRashamiDesaiहा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी रश्मीला पाठींबा दिला. केवळ इतकेच नाही तर अरहानही पोल खोलणा-या सलमानचेही चाहत्यांनी कौतुक केले. आज सलमानने केवळ एका होस्टचे नाही तर एका मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.
Thank you @BeingSalmanKhan for whatever you did today.
— Bhumika ✷ (@bhumika__maru) December 7, 2019
This was very important and needed to be addressed ASAP.
I really hope Rashami doesn't come into this idiot's sweet talks now and closes his chapter.#RashamiDesai you deserve BETTER.#StayStrongRashami#BB13#BiggBoss13
Trust is one of the main pillar of any relationship. And arhaan not just broke it but also broke Rashami💔
— Abbie☔ (@_nefelibataa_) December 7, 2019
I hope Rashami doesn't listen to this fraudster at all. She deserves MUCH MORE better person. Pls @TheRashamiDesai Stay strong. She looks shattered😭#StayStrongRashamipic.twitter.com/hKWpOO9cf6
Her father passed away when she was young, leaving only her mom & her
— . (@ivibhatweedy) December 7, 2019
Started working at 15 to earn
Married/got divorced
Had a miscarriage
Saw bankruptcy
Loved again & gets to know that Arhaan is lying
Have some shame for a day atleast@TheRashamiDesai#StayStrongRashami#BB13
अरहान व रश्मी ‘बिग बॉस’च्या घरात साखरपुडा करणार, अशी चर्चा होती. यामुळेच त्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. रश्मीबद्दल सांगायचे तर, रश्मीने लहानपणीच आपल्या वडिलांना गमावले. यानंतर घर चालवण्यासाठी वयाच्या 15 व्या वर्षांपासून रश्मी काम करू लागली. काही वर्षांपूर्वी तिने अभिनेता नंदिश संधूसोबत लग्न केले होते. मात्र तीनच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला होता.