Bigg Boss 13 Finale : आठ वर्षांनी पुन्हा विजेता बनू शकतो करोडपती, कसे ते घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 18:13 IST2020-02-15T18:12:45+5:302020-02-15T18:13:35+5:30
Bigg Boss 13 Finale : बिग बॉस सीझन १३च्या ग्रॅण्ड सोहळ्याला लवकरच सुरूवात होणार आहे.

Bigg Boss 13 Finale : आठ वर्षांनी पुन्हा विजेता बनू शकतो करोडपती, कसे ते घ्या जाणून
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस १३चा ग्रॅण्ड फिनाले आज पार पडणार आहे. याचे प्रसारण रात्री नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजेत्याचे नाव रात्री ११ वाजेपर्यंत जाहीर केले जाईल. बिग बॉस १३मध्ये यावेळी सहा फायनलिस्ट आहेत. यात सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल, आरती सिंग, रश्मी देसाई, पारस छाब्रा व आसिम रियाज यांचा समावेश आहे. या सहा जणांपैकी या शोचा विजेता कोण होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच विजेत्याला किती बक्षीस मिळणार हे देखील त्यांना जाणून घ्यायचे आहे.
बिग बॉस १३ स्पेशल ठरला आहे. जवळपास साडे चार महिन्यांपासून सुरू असलेला हा शो आतापर्यंतचा यशस्वी सीझन आहे. याआधीच्या सीझनचा कालावधी तीन महिने होता. मात्र या शोची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी हा शो आणखीन दीड महिना वाढवला होता. तसेच यावेळेस सहा कंटेस्टंट आहेत. तसेच निर्मात्यांनी यावेळेस विजेत्याला करोडपती करायचे ठरविले असल्याचे समजते आहे.
अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, शोचे यश पाहता शोच्या निर्मात्यांनी बक्षीसाचे मानधन वाढवले आगे. यावेळेसचा शो जास्त चर्चेत राहिला आहे. त्यामुळे निर्माते खूप खूश आहेत आणि त्यांनी बक्षीसाची किंमत दुप्पट केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बक्षीसाची किंमत आतापर्यंत ५० लाख रुपये होती. मात्र आता ती १ कोटी करण्यात आली आहे. म्हणजेच बक्षीसाची रक्कम दुप्पट झाली आहे. मात्र अद्याप अधिकृतरित्या वाहिनी व निर्मात्यांकडून याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.
मात्र यापूर्वीदेखील शोमधील काही विजेत्यांना १ कोटी रुपये बक्षिस मानधन म्हणून देण्यात आले आहे. यात जुही परमार, श्वेता तिवारी, विंदु दारा सिंग, आशुतोष कौशिक व राहुल रॉय या विजेत्यांचा समावेश आहे. आता तेराव्या सीझनमधील स्पर्धकाला १ कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळतात की नाही हे काही वेळात स्पष्ट होईल.