Bigg Boss 13 : घरातील या सदस्याच्या घोरण्यामुळे कंटाळले सगळेच स्पर्धक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 06:01 PM2019-10-02T18:01:47+5:302019-10-02T18:08:32+5:30
बिग बॉसमधील एका सदस्याच्या घोरण्यामुळे सगळ्याच स्पर्धकांची झोप खराब झाली आहे.
सलमान खानचा 'बिग बॉस 13' हा प्रसिद्ध रिॲलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. बिग बॉस १३ चा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या कार्यक्रमात कोण कोण स्पर्धक हजेरी लावणार याचा अंदाज लावला जात होता. या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रेक्षकांना रविवारी पाहायला मिळाला. यामध्ये सलमानने त्याच्या अंदाजात कार्यक्रमातील स्पर्धकांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमामधील नवीन नियमांविषयी सांगितले. बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच महिला सदस्य आणि पुरुष सदस्य एकाच बेडवर झोपताना दिसत आहेत.
पारस छाब्रा त्याचे बेस्ट फ्रेंड्स असलेले आरती सिंग आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यासोबत बेड शेअर करत आहे. घरात येऊन काहीच दिवस झाले असल्याने प्रत्येकजण एकमेकांसोबत कर्म्फटेबल व्हायचा प्रयत्न करत आहे. तर घरात पहिल्याच दिवसापासून भांडणं व्हायला सुरुवात झाली आहेत. आता तर एका सदस्याच्या घोरण्यामुळे सगळ्याच स्पर्धकांची झोप खराब झाली आहे. टास्कमुळे बिग बॉसच्या घरात असणाऱ्या कोणत्याच स्पर्धकाला झोपता आले नाही आणि त्यामुळे ते सकाळी साडे सात वाजता झोपायला गेले. पण त्याचवेळी एका आवाजामुळे सगळ्याच सदस्यांची झोप उडाली. सिद्धार्थ शुक्ला जोराजोरात घोरत असल्याने त्याच्या आवाजाने सगळ्यांना त्रास होत होता. आपल्या मित्राने हे घोरणे ऐकून शहनाझ गिल मोठ्यामोठ्याने हसायला लागली तर या आवाजाने कंटाळून रश्मी देसाई न झोपता बेडवर बसून राहिली.
बिग बॉस 13 च्या प्रीमियरमध्ये बिग बॉस या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खान आणि या कार्यक्रमातील स्पर्धकांचा धमाकेदार पराफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सध्या देवोलिना भट्टाचार्जी, रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, शेहनाझ गिल, पारस छाब्रा, कोएना मित्रा, दलजीत कौर, सिद्धार्थ डे, आरती सिंग, आसिम रियाज, अबू मलिक, शेफाली बग्गा, माहिरा शर्मा यांसारखे स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत तर अमिष पटेल या घरात मालकिणीच्या भूमिकेत असून ती स्पर्धकांना टास्क देताना दिसते.