'बिग बॉस १३'मधील विनरला प्राईजमध्ये मिळणार इतके कोटी, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 13:58 IST2020-02-14T13:57:06+5:302020-02-14T13:58:57+5:30
बिग बॉस १३ अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे.

'बिग बॉस १३'मधील विनरला प्राईजमध्ये मिळणार इतके कोटी, जाणून घ्या याबद्दल
बिग बॉस १३ अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. या शोच्या अंतिम सोहळ्याला शेवटचा एक दिवस उरला आहे. उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारीला लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या तेराव्या सीझनचा विजेता जाहीर केले जाणार आहे. या शोमधून माहिरा शर्मा बाहेर पडल्यानंतर आता घरात फक्त शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंग एवढेच कंटेस्टंट उरले आहेत. त्यामुळे या सर्वांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पण या सीझनच्या विजेत्याला किती प्राईज देणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
कलर्स टीव्हीवरील बिग बॉसच्या तेराव्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा वाढता टीआरपी पाहून शो आणखीन काही दिवस वाढवले. आता सूत्रांच्या माहितीनुसार यंदाच्या सीझनमध्ये विजेत्याला मिळाणाऱ्या रक्कमेत वाढ झाली आहे.
आतापर्यंतच्या सीझनमध्ये ही रक्कम ५० लाख एवढी होती मात्र यंदाच्या सीझनसाठी ही रक्कम दुप्पट वाढवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बिग बॉस १३च्या विजेत्याला १ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच अंतिम सोहळ्यात टॉप सहा कंटेस्टंट पोहचले आहेत. नुकतीच माहिरा शर्मा घरातून बाहेर पडली. भूत सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलेला विकी कौशल घरातून जाताना माहिराला घेऊन गेला. जाते वेळी माहिराला अश्रू अनावर झाले होते.
माहिराचं स्वप्न तुटलं आहे. तिला शोची विनर व्हायचं नव्हतं तर या शोमधील स्वतःचा प्रवास पाहण्याचं तिचं स्वप्न होतं. आता सहा जणांपैकी कोण विजेता ठरतोय, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.