Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्ला जिंकूनही ‘हरला’; लोकांनी केले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 11:23 AM2020-02-16T11:23:19+5:302020-02-16T11:28:48+5:30
बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर एकीकडे सिद्धार्थवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दुसरीकडे अनेकांनी त्याच्यावर टीकेचा भडीमार केला आहे.
सिद्धार्थ शुक्ला ‘बिग बॉस 13’चा विजेता बनला. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर एकीकडे सिद्धार्थवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दुसरीकडे अनेकांनी त्याच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. सिद्धार्थ हा ‘बिग बॉस 13’च्या विजेता बनण्याच्या पात्रतेचा नाहीय, अशा टोकाच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. अनेकांनी हा शो बायस्ड असल्याचा आरोप केला आहे. केवळ इतकेच नाही तर अनेकांनी ट्विटरवर सिद्धार्थ शुक्लाविरोधात मोहिम छेडली आहे. सिद्धार्थला ‘बिग बॉस 13’चा विजेता घोषीत करताच चाहते ट्विटरवर अॅक्टिव्ह झालेत. काहींनी सिद्धार्थवर शुभेच्छांचा वर्षाव केला तर अनेकांनी सिद्धार्थच्या विरोधात आणि आसिमच्या समर्थनार्थ मोहिम सुरु केली. काही क्षणात ट्विटरवर #FixedWinnerSidharth, #boycottcolorstv असे हॅशटॅग ट्रेंड करू लागलेत.
#FixedWinnerSidharth
The trophy doesn't deserve you...
Your victory was served on a platter for you.
Inspite of breaking so many rules @sidharth_shukla Wasn't thrown out,
Never questioned for his abusive & aggressive behavior,
Infact he was given all the liberty.#BiggBoss13— Dirag(SidHeart)😍😘❣️ (@DSidheart) February 16, 2020
सिद्धार्थ ‘बिग बॉस 13’चा विजेता बनल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एका युजरने तर थेट ‘तू ही ट्रॉफी डिजर्व करत नाही. तू घरात किती नियम तोडलेस, पण तरीही तुझ्याविरोधात काहाही कारवाई झाली नाही. तुझ्या तापट स्वभावाचा फटका अनेकांना बसला. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,’असे एका युजरने लिहिले.
Sidharth Shukla taught me
- How not to talk to women
- How not to talk to friends
- How not to get physical wt ppl
- How not to suffer frm superiority complex
Even Vindu never treated women like this (cos no woman ever talk to Vindu) 😭😌#FixedWinnerSidharthhttps://t.co/fH3rM1EVuq— Baby Driver (@rachitmehra91) February 15, 2020
#SidharthShukIa taught me,
1) Friendship Rules & Values
2) Passion, hardwork & dedication
3) Fearless attitude
🐅
Vo Sher ke jaisa aaya, aur Sab ka Shikar kar ke chala gaya🏆
Best contestant #BB13
#BiggBoss13Finale#BB13Finalepic.twitter.com/U5ckpBGFaJ— CA Rakesh ❤🇮🇳 ❤ (@albelaindian) February 15, 2020
काही युजर्सनी तर सिद्धार्थला विरोध करत ‘बिग बॉस’ जिंकण्यासाठी आवश्यक पात्रतांची यादीच जाहीर केली. ‘बिग बॉस जिंकायचे तर कुणासोबत तरी अफेअर असायला हवे. तुम्हाला ड्रग्जचे व्यसन हवे. महिलांसोबत गैरवर्तन करता यायला हवे. दुस-या स्पर्धकांसोबत सतत भांडण, वाद करता यायला हवे आणि आपल्या चुका लपवण्यासाठी मूर्खपणाच्या सबबी देऊन स्वत:ला योग्य सिद्धता करता यायला हवे,’असे एका युजरने उपरोधिकपणे लिहिले. एकंदर काय तर ‘बिग बॉस 13’ जिंकल्यानंतर सिद्धार्थला शुभेच्छा कमी आणि टीका जास्त सहन करावी लागली.