Bigg Boss 14: ‘आईने काय संस्कार दिलेत माहिती नाही’, म्हणणारे कुमार सानू आपल्या विधानावरून पलटले
By रूपाली मुधोळकर | Published: November 1, 2020 03:05 PM2020-11-01T15:05:08+5:302020-11-01T15:09:17+5:30
आईने त्याला (जानला)कसे संस्कार दिले हे माहित नाही. पण वडिल म्हणून मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो, असे कुमार सानू म्हणाले होते. मात्र आता...
कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानूने मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर कलर्स वाहिनेनी अधिकृतपणे याप्रकरणी माफी मागितली. स्वत: जान कुमार सानूनेही माफी मागितले. एवढेच नाही तर जान कुमार सानूचे वडील व सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांनीही आपल्या मुलाने केलेल्या व्यक्तव्याबद्दल माफी मागितली. अर्थात ही माफी मागताना कुमार सानूने जानच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आईने त्याला (जानला)कसे संस्कार दिले हे माहित नाही. पण वडिल म्हणून मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो, असे कुमार सानू म्हणाले. मात्र आता या वाक्यावरून त्यांनी घुमजाव केले आहे.
पूर्वाश्रमीच्या पत्नीची केली प्रशंसा
कुमार सानू यांनी आधी पोस्ट केलेल्या व्हिडीओत पूर्वाक्षमीची पत्नी रिता भट्टाचार्य हिने मुलाला दिलेल्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जानला त्याच्या आईने काय शिकवण दिली माहिती नाही. पण बाप म्हणून जान जे काही बोलला त्याबद्दल मी माफी मागतो, असे कुमार सानू आधीच्या व्हिडीओत म्हणाले होते. आता मात्र त्यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते पहिल्या पत्नीची प्रशंसा करताना दिसत आहे.
‘मित्रांनो, सॉरी मी हा व्हिडीओ तुमच्यासाठी आधीच बनवू इच्छित होतो. पण दुर्दैवाने मला आधी माफीनामा बनवावा लागला. तुम्ही समजून घ्याल ही आशा आहे,’असे कुमार सानू यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे. माझा मुलगा जान नॉर्मल लाईफमध्ये खूप गुणी मुलगा आहे. पण बिग बॉसच्या घरातील वातावरण वेगळे आहे. दबाव जास्त आहे. अशात काही चुकीच्या गोष्टी तोंडातून निघतात. कारण वय लहान आहे. पण एक गोष्ट आहे. आईने त्याला खूप चांगले संस्कार दिलेत. त्याने बिग बॉसमध्ये जाऊ नये, अशी माझी इच्छा होती. पण तो गेला. तो त्याचा निर्णय होता. त्याच्या या निर्णयात माझा काहीही वाटा नाही, असे कुमार सानू व्हिडीओत म्हणताना दिसतात.
राहुल वैद्यला दिला सल्ला
तू माझ्या मुलासारखा आहे. तू खूप चांगला गातोस. पण एखाद्याचे आईवडिल विभक्त झाले असतील तर त्याला वेळावेळी त्याची जाणीव करून देण्याची गरज नाही, हे लक्षात ठेव. दोन लोकात पटले नाहीत तर ते वेगळे होतात. ही एक सामान्य गोष्ट आहे. यात काहीही नवे नाही. आज 40 वर्षांनंतर मला ही गोष्ट ऐकवली गेली आणि गोष्टींमुळे एक सिंगर या नात्याने मला खूप अपमानास्पद वाटले. खेळावर लक्ष दे,असा सल्ला कुमार सानू यांनी बिग बॉस स्पर्धक राहुल वैद्यला दिला आहे. याच राहुल वैद्यसोबत जानचे भांडण झाले होते.
जान कुमार सानूच्या मराठी विरोधी वक्तव्यावर गायक कुमार सानू यांनी मागितली माफी, म्हणाले -