Bigg Boss 14: नोराने स्पर्धकांना दिलं 'गरमी' गाण्यातील हुक स्टेप करण्याचं चॅलेंज, पोट धरून हसू लागला सलमान
By अमित इंगोले | Updated: October 26, 2020 11:44 IST2020-10-26T11:43:54+5:302020-10-26T11:44:08+5:30
दसरा स्पेशल एपिसोडचा प्रोमो कलर्स चॅनलने जारी केला. यात घरातील सगळेच मेल स्पर्धक नोराचं सुपरहिट गाणं 'गरमी'ती हुक स्टेप करताना दिसत आहेत.

Bigg Boss 14: नोराने स्पर्धकांना दिलं 'गरमी' गाण्यातील हुक स्टेप करण्याचं चॅलेंज, पोट धरून हसू लागला सलमान
दसऱ्यानिमित्ताने बिग बॉस १४ च्या घरातील लोकांना एक सरप्राइज मिळालं. घरात सेलिब्रिटी गेस्ट म्हणून अभिनेत्री-डान्सर नोरा फतेही आली होती. ती बिगग बॉसच्या घरातील स्पर्धकांसोबत गंमत-मस्ती करताना दिसली. दसरा स्पेशल एपिसोडचा प्रोमो कलर्स चॅनलने जारी केला. यात घरातील सगळेच मेल स्पर्धक नोराचं सुपरहिट गाणं 'गरमी'ती हुक स्टेप करताना दिसत आहेत.
घरातील सर्वांनी केलेली नोराची ही डान्स स्टेप पाहून शोचा होस्ट सलमान खान आणि फीमेल स्पर्धकांना हसू आवरलं नाही. तशी नोराही २०१६ मध्ये बिग बॉस सीझन ९ मध्ये स्पर्धक होती. इथे ८४ दिवस काढल्यावर ती शोमधून बाहेर गेली होती.
दरम्यान, बिग बॉस १४ चा तूफानी सीनिअर सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खानच्या शोमधून एक्झिटनंतर आता तीन स्पर्धक घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहेत. त्यांची नावे कविता कौशिक, नैना आणि शार्दुल पंडित आहेत.
कलर्स चॅनलने शोमध्ये तिघांच्या एन्ट्रीा प्रोमोही जारी केला आहे. ज्यात ते सलमानसमोर काही बोलताना दिसत आहेत. त्यांच्या गोष्टी ऐकून सलमान हैराण होतो. नैनाला बघून शार्दुल सांगतो की, तो नैनाला एका इव्हेंटमध्ये भेटला आहे. त्यावेळी ती त्याच्या मांडीवर येऊन बसली होती.
नैनाला ही बाब ऐकून धक्का बसतो आणि म्हणाली की, त्याला मांडीवर येऊन बसणं नाही तर को-होस्टिंग म्हणतात. शार्दुलचं हे बोलणं ऐकून नैना म्हणाली की, याचं ती त्याला घरात उत्तर देईल. आता हे बघावं लागेल की, हे तिन्ही वाइल्ड कार्ड स्पर्धक घरात काय धिंगाणा घालतात.