VIDEO : आता तर हद्दच झाली! राखी सावंतने चक्क अभिनव शुक्लाचे अंतर्वस्त्र फाडले!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 15:01 IST2021-01-28T14:58:33+5:302021-01-28T15:01:06+5:30
राखी झाली ट्रोल...

VIDEO : आता तर हद्दच झाली! राखी सावंतने चक्क अभिनव शुक्लाचे अंतर्वस्त्र फाडले!!
‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने नुसता कहर केलाय. हो, रूबीना दिलैकचा पती अभिनव शुक्लाच्या प्रेमात राखी अक्षरश: वेडीपीसी झालीय. काल राखीने काय केले तर संपूर्ण शरीरावर अभिनवचे नाव लिहून घेतले. आता तिने काय करावे तर चक्क अभिनवचे अंतर्वस्त्र फाडले.
होय,त्याने माझा विश्वासघात केला, असे म्हणून राखी कात्रीने अभिनवचे अंतर्वस्त्र फाडताना दिसली. हा किस्सा आहे बिग बॉसच्या घरातील सायकल टास्कदरम्यानचा. या टास्कदरम्यान अभिनवने म्हणे राखीची मदत करण्यास नकार दिला. तिच्याकडे दुर्लक्ष केले. याचा बदला म्हणून राखीने कात्री घेतली अन् कॅमे-यासमोर अभिनवची अंतर्वस्त्र टराटरा फाडले.
एंटरटेनमेंटच्या नावाखाली राखीने आत्तापर्यंत केलेली अनेक कृत्ये चाहत्यांना आवडली. पण यावेळी मात्र तिने अशी हद्द केलेली पाहून चाहते भडकले. यानंतर राखी चांगलीच ट्रोल झाली.
काल परवा राखीने अभिनवचे प्रेम व्यक्त करण्यासाठी राखीने संपूर्ण अंगावर त्याचे नाव लिहून घेतले होते. आय लव्ह अभिनव असे लिहून ती घरभर वावरली होती. तिचे हे कृत्य घरातील सदस्यांना आवडले नव्हते. अभिनवची पत्नी रूबीनाही राखीच्या या वागण्याला कंटाळल्याचे तूर्तास दिसत आहे.
राखी सावंत सध्या बिग बॉसच्या घरात मनोरंजनाच्या नावावर अक्षरश: धुमाकूळ घालतेय. काही दिवसांपूर्वीच वीकेंड का वॉरमध्ये याच कारणासाठी सलमान खानने राखी सावंतला झापले होते.
एका एपिसोडमध्ये राखीने डबल मीनिंग व वल्गर कमेंट पास केली होती. अली गोनीने तिच्या या कमेंटवर आक्षेप घेतला होता वीकेंडच्या वॉरमध्ये यावरून सलमानने राखीचा क्लास घेतला होता.