Bigg Boss 14: राखी सावंतचा अनामिक नवरा आला समोर, सांगितले लग्न लपवल्यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 17:23 IST2020-12-22T17:23:28+5:302020-12-22T17:23:53+5:30
राखी सावंतचा नवरा रितेश युकेमध्ये वास्तव्यास असून एक बिझनेसमन आहे.

Bigg Boss 14: राखी सावंतचा अनामिक नवरा आला समोर, सांगितले लग्न लपवल्यामागचे कारण
बॉलिवूडची कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये पहायला मिळत आहे. बिग बॉस सोबत राखी पर्सनल लाइफशी निगडीत रहस्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हे रहस्य म्हणजे राखीचे लग्न. राखी आतापर्यंत दावा करत आली आहे की ती विवाहीत आहे. पण आतापर्यंत कुणीच तिच्या नवऱ्याला पाहिले नाही आणि राखीदेखील कधी आपल्या नवऱ्यासोबत दिसली नाही. बिग बॉसच्या घरात राखीने या गोष्टीचा उल्लेख केला की ती विवाहित आहे आणि तिचा नवरा परदेशात राहतो. या सर्व वृत्तांदरम्यान राखी सावंतचा नवरा ज्याला आतापर्यंत कुणी पाहिले नव्हते तो सर्वांसमोर आला आहे.
राखी सावंतचा नवरा रितेश युकेमध्ये वास्तव्यास असून एक बिझनेसमन आहे. राखी सावंतचा पती रितेशने बॉम्बे टाइम्सशी बातचीत केली. त्याने सांगितले की,
'माझ्या स्वार्थी हेतूमुळे मी अद्याप सर्वांसमोर आलो नाही. माझे लग्न आतापर्यंत लपवून ठेवले होते, ही माझी चूक होती. मला असे वाटायचे की मी राखीशी माझी ओळख असणे आणि मी राखीशी लग्न करणे हे जर जगाला समजले तर माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातील.
तो पुढे म्हणाला की, या तुमच्या या माध्यमातून मी हे जगाला सांगू इच्छितो की, माझे राखी सावंतसोबत लग्न झालेले आहे. तिने माझ्याशी लग्न करुन माझ्यावर उपकारच केले आहेत. राखी अतिशय उत्तम पत्नी आहे. ती एक चांगली मैत्रीणही आहे.
मी तिला माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट सांगतो. माझ्या निर्णयामुळे ते आमचे लग्न लपवून ठेवण्यात आले होते. राखीनेही मला या निर्णयात साथ दिली. मला तिचा अभिमान वाटतो. पण आता मला एक संधी मिळाली आहे, मी ठरवले आहे की मी सर्वांसमोर येईन आणि माझी ओळख सगळ्यांना सांगेन. मी माझा फायदा तोटा बघणार नाही. माझे आणि राखीचे सत्य सर्वांना सांगेन.'
इतकेच नाही तर रितेशने बिग बॉसमधील स्पर्धक निकी तांबोळीने राखीबद्दल केलेल्या वक्तवांबद्दल नाराजी दर्शवली. रितेश म्हणाला, 'मी रिकी तांबोळीविरोधात केसही करू शकतो. पण तसे करणार नाही कारण तो एक गेम शो आहे.'