Bigg Boss 14: 'वीकेंड का वॉर'मध्ये सलमान खान करणार पोलखोल, एजाज खानचे सीक्रेट येणार सगळ्यांसमोर
By तेजल गावडे | Updated: October 10, 2020 19:10 IST2020-10-10T19:09:21+5:302020-10-10T19:10:15+5:30
वीकेंड का वॉरमध्ये सलमान खान घरातील काही सदस्यांची शाळा घेणार आहे.

Bigg Boss 14: 'वीकेंड का वॉर'मध्ये सलमान खान करणार पोलखोल, एजाज खानचे सीक्रेट येणार सगळ्यांसमोर
बिग बॉसच्या चौदाव्या सीझनला नुकतीच सुरूवात झाली आहे आणि आज बिग बॉस १४चा पहिला वीकेंड का वॉर प्रसारीत होणार आहे. यात सलमान खान काही सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे. शोचा प्रोमो समोर आला आहे ज्यात सलमान खानने काही कंटेस्टंटच्या प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एजाज खानचा एक व्हिडिओदेखील दाखवला जाणार आहे.
या व्हिडिओत एजाज खानच्या खासगी जीवनातील बरेच सीक्रेट समोर येणार आहेत. ज्यात तो सिद्धार्थ शुक्लासोबत बोलत आहे. समोर आलेल्या या अनसीन व्हिडिओत एजाज म्हणतो की, तर मी असा होतो २०११ पर्यंत.. जर मी कोणत्याही मुलीला पाहायचो तर खूप मोठा मोठा कांड होता होता वाचलो. इथे त्यांची संपूर्ण बातचीत दाखवलेली नाही.
त्यानंतर एजाज खान, सलमानला म्हणाला की, माझ्यासोबत असे काही झाले होते की मी आता खूप ऑकवर्ड झालो आहे. एजाजला समजवताना सलमान म्हणाला की, जर तू चुकीचा गेलास तर चुकीचाच दिसणार. तू सटकला आहेस. सलमान पुढे म्हणाला की, कोणत्या गोष्टीमुळे घाबरतो आहेस एजाज. इथून स्थिती वॉरसारखी आहे.
आता एजाज असे कोणते सीक्रेट आहे ज्याबद्दल माहित नाही. ते आजच्या वीकेंड का वॉरमध्ये समजेल. एजाज खान टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्यावर दुष्कृत्य केल्याचा आरोप आहे. त्याची गर्लफ्रेंड निधी कश्यपने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तेव्हा एजाज म्हणाला होता की ब्रेकअपनंतर त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर हे आरोप केले आहेत.
वीकेंड का वॉरमध्ये सलमान खान निक्की तांबोळीला एक टास्क देणार आहे. ज्यात तिला दोन मिनिटांच्या आत बीबी मॉलमधील सामान उचलावे लागणार आहे. सलमान स्टार्ट म्हणताच ती मॉलच्या आत जाते आणि बरेच सामान घरातून बाहेर आणण्यात यशस्वी होते.