Bigg Boss 15: 'त्या दोघांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला'; महिला स्पर्धकाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 05:25 PM2021-11-04T17:25:00+5:302021-11-04T17:25:00+5:30
bigg boss 15: बिग बॉस १५ सुरु झाल्यापासून यातील स्पर्धक असभ्य वर्तन, शिवीगाळ, वादविवाद अशा अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहेत.
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस(Bigg Boss) . यंदा या शोचं १५ वं पर्व सुरु असून हे पर्व विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. बिग बॉस १५ (Bigg Boss 15) सुरु झाल्यापासून यातील स्पर्धक असभ्य वर्तन, शिवीगाळ, वादविवाद अशा अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहेत. यामध्येच आता या घरातील सतत चर्चेत राहत असलेल्या अफसानाने (Afsana Khan) सिंबा नागपाल (Simba Nagpal) आणि प्रतिक (pratik) यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या पर्वाला वेगळं वळण लागलं आहे.
बिग बॉसच्या घरात एका टास्क दरम्यान प्रतिक आणि सिंबाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप अफसानाने केला. इतकंच नाही तर तिने घरात आरडाओरड करायला सुरुवात केली. तिच्या या आरोपांनंतर प्रतिक आणि सिंबाने हे आरोप फेटाळून लावत तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. 'मला तुझ्याशी नीट बोलायला देखील आवड नाही. मी काय तुला स्पर्श करणार. तू निघ इकडून', असं सिंबा म्हणाला. त्यानंतर हा वाद कमालीचा वाढला.
BIGG BOSS चं घर मुलींसाठी धोकादायक?अभिनेत्रीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा
शमिताने घेतली प्रतिक, सिंबाची बाजू
'अफसानाने नारळ तिच्या टी शर्टमध्ये लपवले होते. या प्रकारे ती तिचा डिफेंड करु शकत नाही. आता गेम कसा खेळायचा हा तिचा निर्णय आहे. परंतु, अशा गेममध्ये वुमन कार्ड खेळणं योग्य नाही,' असं शमिता म्हणाली.
दरम्यान, प्रतिक,सिंबा आणि अफसानाच्या वादात घरातील अन्य सदस्यांमध्येही वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. करण कुंद्राने अफसानाची बाजू घेतल्यामुळे घरातील अन्य स्पर्धक त्याच्यावर संतापले. ज्यामुळे करणला अश्रू अनावर झाले.