Bigg Boss 15 : तर मी आज या परिस्थितीत नसतो..., बालपणी जे घडलं ते आठवून रडला करण कुंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 02:08 PM2021-11-14T14:08:52+5:302021-11-14T14:09:23+5:30

Bigg Boss 15: ‘बिग बॉस 15’चा कालचा ‘वीकेंड का वार’ स्पेशल एपिसोड चांगलाच भावूक करणारा ठरला.

Bigg Boss 15: bigg boss 15 karan kundrra broke down remembering his childhood incident of how his parents failed to understand him | Bigg Boss 15 : तर मी आज या परिस्थितीत नसतो..., बालपणी जे घडलं ते आठवून रडला करण कुंद्रा

Bigg Boss 15 : तर मी आज या परिस्थितीत नसतो..., बालपणी जे घडलं ते आठवून रडला करण कुंद्रा

googlenewsNext

बिग बॉस 15’चा (Bigg Boss 15) कालचा ‘वीकेंड का वार’ स्पेशल एपिसोड चांगलाच भावूक करणारा ठरला. या एपिसोडमध्ये सलमानने एकीकडे जय भानुशाली, उमर रियाज आणि प्रतिक सहजपालचा चांगलाच क्लास घेतला. दुसरीकडे करण कुंद्रा ( karan kundrra ) काहीसा इमोशनल झालेला दिसला. करणने बालपणीचा अनुभव शेअर केला आणि सांगता सांगता त्याला अश्रू अनावर झालेत.

या भावुक क्षणाची सुरूवात झाली ती तेजस्वी प्रकाशच्या एका प्रश्नाने. होय, तू शमिताला समजवायला का गेलास? तिची पर्सनॅलिटी करेक्ट करण्याचा प्रयत्न का करतोय? तू सर्वांना समजावण्याचा ठेका घेतला आहेस का?असा प्रश्न तेजस्वीने करणला विचारला. यावर मी, राजीव अदातियासोबत जे काही झालं, त्याबद्दल शमिताशी बोलायला गेलो होतो,असं करण तिला सांगतो. पण तेजस्वी ऐकण्याच्या मूडमध्ये नसते. यानंतर करण त्याच्या बालपणाचा अनुभव सांगतो.
‘ जेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तिकडे व्यक्त होऊ शकत नाही, तेव्हा कसं वाटतं, ते मी चांगलं समजू शकतो. मी या परिस्थितीतून गेलो आहे. मला आईवडिलांची सोबत मिळावी, त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी विचारपूस करावी, असं लहानपणी मला वाटायचं. पण माझ्या पालकांनी मला समजवण्यापेक्षा मला सतत रागावतं. लहान असताना माझ्याकडे असं कुणी हवं होतं. ज्याच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकलो असतो. असं झालं असतं तर आज मी या परिस्थितीत नसतो, असं सांगत असताना यावेळी करणला रडू कोसळतं.

Web Title: Bigg Boss 15: bigg boss 15 karan kundrra broke down remembering his childhood incident of how his parents failed to understand him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.