‘Bigg Boss 15’च्या स्पर्धकांना कोरोनाचा धोका? मेकर्सनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 06:03 PM2022-01-06T18:03:20+5:302022-01-06T18:03:32+5:30

Bigg Boss 15 : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. टीव्ही इंडस्ट्रीतले अनेक स्टार्सही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता बिग बॉस 15च्या घरालाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.

bigg boss 15 contestants undergo covid 19 tests | ‘Bigg Boss 15’च्या स्पर्धकांना कोरोनाचा धोका? मेकर्सनी घेतला मोठा निर्णय

‘Bigg Boss 15’च्या स्पर्धकांना कोरोनाचा धोका? मेकर्सनी घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

देशभर सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. टीव्ही इंडस्ट्रीतले अनेक स्टार्सही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता बिग बॉस 15च्या घरालाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत कोरोनाने धडकी भरवली असताना, बिग बॉस 15 च्या (Bigg Boss 15 ) घरात कोरोना विषाणू पोहोचू नये, यासाठी शोची टीम सर्वोतोपरी काळजी घेतेय. पण आता कदाचित कोरोना विषाणूचा बिग बॉसच्या घरातही शिरकाव झाल्याची शंका निर्माण झाली आहे.

‘मिस्टर खबरी’ हे फॅन पेज बिग बॉसबद्दलची बित्तंमबातमी शेअर करत असते. या पेजनुसार, देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee )अनेक दिवसांपासून आजारी आहे. तिच्या कोरोनाची लक्षणे आढळली आहे. ही लक्षणे बघता, निर्मात्यांनी ताबडतोब देवोलिनाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तिच्यासोबत बिग बॉसच्या घरातील अन्य सर्व सदस्यांचीही कोरोना टेस्ट झाल्याचे कळतेय. तथापि अद्याप याबद्दल अधिकृत माहिती नाही.

बिग बॉस 15 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेण्यापूर्वी अभिजीत बिचुकलेला कोरोना झाल्याची चर्चा होती. यामुळे त्याची घरातील एन्ट्री लांबली होती. टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्याने घरात एन्ट्री घेतली होती.

सध्या बिग बॉस हा शो अंतिम टप्यातआहे. करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, निशांत भट, प्रतीक सहजपाल, उमर रियाज, रश्मी देसाई, देवोलिना भट्टार्जी, शमिता शेट्टी, राखी सावंत व अभिजीत बिचुकले असे स्पर्धक घरात उरले आहेत.

Web Title: bigg boss 15 contestants undergo covid 19 tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.