Bigg boss 15: 'मला फक्त बिचुकले समजू शकतात'; जोरदार भांडणानंतर देवोलीनाला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 01:35 PM2022-01-02T13:35:47+5:302022-01-02T13:36:41+5:30

Bigg boss 15: प्रतिक सहजपालसोबत भांडण झाल्यामुळे तिला आता बिचुकलेंची आठवण झाल्याचं म्हटलं जात आहे.

bigg boss 15 devoleena bhattacharjee claim that claimed that abhijit is the only person who understands her in the house | Bigg boss 15: 'मला फक्त बिचुकले समजू शकतात'; जोरदार भांडणानंतर देवोलीनाला अश्रू अनावर

Bigg boss 15: 'मला फक्त बिचुकले समजू शकतात'; जोरदार भांडणानंतर देवोलीनाला अश्रू अनावर

googlenewsNext

बिग बॉस 15 (Bigg Boss 15) या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक आपआपसातील वादविवादांमुळे चर्चेत राहिला आहे. यात देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena) आणि अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांचं भांडणं तर गेल्या अनेक दिवस गाजतंय. मात्र, आता देवोलीनाला तिची चूक समजली असून मला फक्त बिचुकलेच समजू शकतात असं ती म्हणाली आहे, त्यामुळे सध्या सोशल मीडियावर देवोलीनाची चर्चा रंगली आहे.

कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये देवोलीना रडत असून बिचुकलेच तिला समजू शकतात असं म्हणतांना ती दिसत आहे. विशेष म्हणजे प्रतिक सहजपालसोबत भांडण झाल्यामुळे तिला आता बिचुकलेंची आठवण झाल्याचं म्हटलं जात आहे.

"तुला माझ्या कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय? परफ्यूम लावल्यामुळे?" असा प्रश्न देवोलीना प्रतिक सहजपालला विचारते. त्यावर "असं काही नाहीये. काल इतकं भांडण झालं, वादविवाद झाले की आत कोणीच बोलत नाहीये. निशांत सुद्धा अचानक आला आणि बोलायला लागला. मी कन्फ्यूज झालोय. इथे नेमकं होतंय तरी काय?", असं प्रतिक म्हणतो.

प्रतिकचं हे वाक्य ऐकल्यावर देवोलीना अभिजीत बिचुकलेंसोबत बोलायला जाते. "इतकं जोरदार भांडण केल्यानंतर मी पुन्हा बोलायला कशी काय येते हा प्रश्न सगळे मला विचारत आहेत. मी तुमच्या विनोदांवर हसते यावर सगळ्यांचा आक्षेप आहे", असं म्हणत देवोलीना रडायला लागते. त्यावर "आपण कुटुंबीय आहोत आणि एक दुसऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठीच एकत्र आहोत", असं अभिजीत उत्तर देतो.

तर दुसरीकडे देवोलीनाला रडतांना पाहून तेजस्वी तिला समजवायला येते. त्यावर "मी या माणसावर कसं काय नाराज राहू. मला माहितीये हा माणूस मनातून चांगला आहे. या घरात फक्त हाच एक माणूस आहे जो मला समजू शकतो. आणि, कदाचित म्हणूनच मी कितीही वाईट बोलले तरीदेखील तो सतत माझ्या मागेपुढे वावरत असतो", असं देवोलीना म्हणते.

दरम्यान, देवोलीना आणि बिचुकले यांच्यात जोरदार भांडण झाल्यानंतरही ते एकमेकांशी कसं काय बोलू शकतात असा प्रश्न प्रतिकला पडतो. टिकट टू फिनाले राऊंडमध्ये देवोलीना आणि बिचकुले यांचं जोरदार भांडण झालं होतं.  देवोलीनाने बिचुकलेंना कुत्रादेखील म्हटलं होतं.

Web Title: bigg boss 15 devoleena bhattacharjee claim that claimed that abhijit is the only person who understands her in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.