Bigg Boss 15: हिला बाहेर हाकला..., राखी सावंतवर भडकले फॅन्स, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 01:54 PM2021-12-23T13:54:59+5:302021-12-23T13:55:28+5:30
Bigg Boss 15 , Fans Trolled Rakhi Sawant: सोशल मीडियावर राखी सावंत सध्या प्रचंड ट्रोल होतेय. राखीसोबत रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यावरही नेटक-यांनी संताप व्यक्त केलाआहे.
‘बिग बॉस’च्या घरातील प्रेमकथा हा वेगळा विषय आहे. प्रत्येक सीझनमध्ये जसे नव नवे वाद होतात तशी प्रेम प्रकरण देखील रंगतात. ‘बिग बॉस 15’मध्येही अशा काही जोड्या चर्चेत आल्या. शो सुरू झाला तसा ईशान आणि मायशा या लव्हबर्ड्सची चर्चा रंगली होती. ही जोडी कधीच शोमधून बाद झाली. यानंतर करण कुंद्रा (Karan Kundrra) व तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)यांच्यात प्रेम फुललं. पण आताश: ही जोडीही तुटणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि यासाठी कारण ठरलीये ती राखी सावंत.
Bigg Boss 15: होय, ‘टिकट टू फिनाले’ टास्कमध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) संचालक होती. यादरम्यान राखीनं अनेक चुकीचे निर्णय घेतले आणि या कारणामुळे तेजस्वी व करण यांच्यात जोरदार भांडण झालं. घरातले लव्हबर्ड्स एकमेकांशी भांडताना पाहून त्यांचे फॅन्स प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी सगळा राग राखीवर काढला. सोशल मीडियावर राखी सावंत सध्या प्रचंड ट्रोल होतेय. करण व तेजस्वीमध्ये भांडण होण्याचं कारण राखी आहे, असा दावा करत चाहत्यांनी राखीला फैलावर घेतलं आहे. राखीसोबत रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यावरही नेटक-यांनी संताप व्यक्त केलाआहे. हे लोक भांडणं लावण्याशिवाय दुसरं काहीही काम करत नाही, अशा शब्दांत अनेकांनी भडास काढली.
@BeingSalmanKhan Rakhi sawanth ko maar ke nikalo
— Khan Mannu (@KhanMannu4) December 22, 2021
Biased hai @BiggBoss liar hai tumhari Rakhi
WE FEEL YOUR PAIN KARAN #KaranIsTheBoss#KaranKundrraSquad
I will never forgive..i mean tejran fam will nvr forgive jo rakhi rashmi ne aag lgayiiii na specially rakhi neeee.. aaj roye h na dono to in logo ki wjh se.. itni misunderstanding itni instigation kri na i want a family week jha inhe koi smjhaye ghr k andr to sb fake h #tejran
— tejran updates | arya (@arya199831) December 22, 2021
‘राखी सावंतला बाहेर काढा. तुमची राखी खोटारडी आहे. करण आम्ही तुझं दु:ख समजू शकतो,’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘हे घर फक्त फालतु लोकांसाठी आहे. राखी, देवो, रश्मीसारख्या लोकांना घरात आणलं. संवेदनशील लोकांना या घरात फक्त वेदना सहन कराव्या लागतात,’अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. ‘राखी तू जी काही आग लावलीस, त्याबद्दल तेजरन (तेजस्वी व करण)चे चाहते तुला कधीही माफ करणार नाहीत,’अशी कमेंट एका युजरने केली.
राखीनं काय केलं?
‘टिकट टू फिनाले’ टास्कची राखी संचालक होती. पहिल्या राऊंडमध्ये तिने शमिताला डावलून देवोलिनाला जिंकू दिलं. इतकंच नाही तर राखीने देवोलिनासोबत मिळून चिटींग करून तेजस्वीला जिंकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेजस्वीही राखी व देवोचा सपोर्ट करताना दिसली. यावरून करण व तेजस्वी यांच्यात वाद झाला. तेजस्वीने प्रामाणिकपणे खेळून जिंकावं, असं करण म्हणाला. पण तेजस्वीने त्याचा चुकीचा अर्थ लावला. मी शो पुढे जावं अशी कदाचित करणची इच्छा नाही, असं बोलताना ती दिसली.