वाईल्ड कार्ड एन्ट्रीही ‘फेल’; ‘या’ तारखेला होणार ‘Bigg Boss 15’चा ग्रँड फिनाले? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 05:44 PM2021-12-12T17:44:43+5:302021-12-12T17:46:38+5:30

Bigg Boss 15 फेब्रुवारी 2022 पूर्वीच बंद होण्याची शक्यता आहे. हे आहे कारण

bigg boss 15 finale date out salman khan will host grand finale on january this day | वाईल्ड कार्ड एन्ट्रीही ‘फेल’; ‘या’ तारखेला होणार ‘Bigg Boss 15’चा ग्रँड फिनाले? 

वाईल्ड कार्ड एन्ट्रीही ‘फेल’; ‘या’ तारखेला होणार ‘Bigg Boss 15’चा ग्रँड फिनाले? 

googlenewsNext

बिग बॉस’ म्हणजे टीव्हीवरचा लोकप्रिय शो. पण कदाचित यंदाचा या शोचा 15 वा सीझन  (Bigg Boss 15) फार काही कमाल दाखवू शकला नाही. मेकर्सच्या अनेक प्रयत्नानंतरही शो टीआरपी शर्यतीत मागे पडला तो पडलाच. ‘बिग बॉस 15’ची सुरुवात धमाकेदार झाली. अनेक लोकप्रिय चेहरे स्पर्धक बनून बिग बॉसच्या घरात आलेत. या स्पर्धकांच्या जोरावर बिग बॉसच्या हा सीझन गाजणार, अशी अपेक्षा होती. पण एकापाठोपाठ एक कंटाळवाणे टास्क आणि शॉकिंग एलिमिनेशनमुळे चाहत्यांची निराशा झाली आणि याचा थेट परिणाम टीआरपीवर झाला.

टीआरपीसाठी मेकर्सनी एक नाही तर पाच जणांना वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून घरात आणलं.   ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या पतीसोबत घरात आली, बिग बॉस मराठीत गाजलेलं नाव अभिजीत बिचुकले यालाही घरात आणलं गेलं. शिवाय रश्मी देसाई व देवोलिना भट्टाचार्जी यांचीही एन्ट्री झाली. पण कदाचित याचाही फार काही फायदा झाला नाही. त्यामुळे आता लवकरच हा शो गुंडाळण्याची तयारी सुरु झाली आहे.

होय, आधी हा शो  फेब्रुवारी पर्यंत चालणार, असं म्हटलं जात होतं. पण आता येत्या जानेवारीतच शो बंद होणार असल्याची चर्चा आहे. ‘द खबरी’ने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या 22/23 जानेवारीला ‘बिग बॉस 15’चा ग्रँड फिनालेहोणार आहे.  निर्मात्यांनी शो लांबवला नाही तर जानेवारीतच शो बंद होईल.  (Bigg Boss 15 Finale Date OUT )

फॅमिली टास्क रंगणार
दरवर्षी प्रमाणे यंदाही बिग बॉसच्या घरात फॅमिली टास्क होणार आहे. म्हणजे, घरातील सदस्यांना कुटुंबातील सदस्य भेटणार आहेत. अर्थात यावेळी कुटुंबीयांना भेटण्यासाठी स्पर्धकांना आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी 15 लाख रूपये द्यावे लागणार आहेत. याचा एक प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे.
 

Web Title: bigg boss 15 finale date out salman khan will host grand finale on january this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.