Bigg Boss 15 : करण कुंद्रा तेजस्वीला देतोय दगा ? खऱ्या आयुष्यात या को-स्टारच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 12:41 PM2021-11-15T12:41:36+5:302021-11-15T12:42:32+5:30

Bigg Boss 15 : होय, चर्चा खरी मानाल तर करणच्या आयुष्यात तेजस्वी नाही तर दुसरीच एक बाला आहे.

Bigg Boss 15: Is Karan Kundrra Dating Yogita Bihani In Real Life? Reports Claim He’s Fooling Tejasswi Prakash! | Bigg Boss 15 : करण कुंद्रा तेजस्वीला देतोय दगा ? खऱ्या आयुष्यात या को-स्टारच्या प्रेमात?

Bigg Boss 15 : करण कुंद्रा तेजस्वीला देतोय दगा ? खऱ्या आयुष्यात या को-स्टारच्या प्रेमात?

googlenewsNext

बिग बॉस 15’च्या घरात करण कुंद्रा (Karan Kundrra ) व तेजस्वी प्रकाश ( Tejasswi Prakash) यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री चांगलीच गाजतेय. या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची चर्चा होणार नसेल तर नवल. अगदी सोशल मीडियावरच्या चाहत्यांनी या दोघांना ‘तेजरन’ असं नाव दिलं आहे. अर्थात दुसरीकडे तेजस्वी व करणची ही केमिस्ट्री ‘फेक’ असल्याचाही लोकांचा आरोप आहे. चर्चा खरी मानाल तर करणच्या आयुष्यात तेजस्वी नाही तर दुसरीच एक बाला आहे. होय, करण त्याची जुनी को-स्टार योगिता बिहानीला (Yogita Bihani) डेट करतोय, असं म्हटलं जातंय.
‘द खबरी’च्या दाव्यानुसार, बिग बॉस 15 मध्ये येण्याआधीपासूनच करण व योगिता प्रेमात आहेत. इतकंच नाही तर हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचंही मानलं जातंय. 

गेल्या एपिसोडमध्ये  करण कुंद्राच्या गळ्यात एक चेन आणि त्यात छोटंस लॉकेट दिसलं होतं. टास्कदरम्यान करण या लॉकेटचं चुंबन घेताना दिसला होता. एका दाव्यानुसार, ही चेन योगिताची आहे. कारण करणआधी योगिताच्या गळ्यात हीच चेन दिसली होती.

करण व योगिता खरंच रिलेशनशिपमध्ये असतील तर तेजस्वीसोबतची त्याची रोमॅन्टिक केमिस्ट्री खरी की खोटी? असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे. काही चाहत्यांच्या मते, करण व योगिता फक्त चांगले मित्र आहेत. यापेक्षा त्यांच्यात काहीही नाही. तर काहींच्या मते, तेजस्वी व करणचं बिग बॉसच्या घरातील नातं मुळातंच फेक आहे. आता खरं काय ते करणलाच ठाऊक?
तेजस्वी व करणच्या लव्हस्टोरीच्या पार्श्वभूमीवर व्हिजे एंडीला दिलेल्या मुलाखतीत अलीकडे डोनल बिष्टने  अनेक सवाल उपस्थित केले होते.  ‘करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, जय भानुशाली, सिम्बा नागपाल आणि अकासा सिंग यांना बिग बॉसकडून सतत कन्फेशन रूममध्ये बोलवले जात होते. बाहेर आल्यावर बिग बॉस काय म्हणाले असं विचारल्यावर पर्सनल इश्यू होता, असं म्हणून ते बोलायचं टाळायचे,’असे डोनल म्हणाली होती. डोनल बिष्ट ही सुद्धा ‘बिग बॉस 15’ची स्पर्धक होती. मात्र दोनच आठवड्यात ती शोमधून बाद झाली होती.

Web Title: Bigg Boss 15: Is Karan Kundrra Dating Yogita Bihani In Real Life? Reports Claim He’s Fooling Tejasswi Prakash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.