Bigg Boss 15: टास्कदरम्यान बिघडली तेजस्वीची तब्येत, करण कुंद्राने अख्ख घर डोक्यावर घेतलं...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:50 PM2021-10-26T15:50:35+5:302021-10-26T16:00:05+5:30
Bigg Boss 15: तेजस्वीवर माझा क्रश आहे, अशी कबुली Karan Kunrdrraने कधीच दिलीये. अशात करण व तेजस्वीचा एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
बिग बॉस 15 च्या (Bigg Boss 15) घरात सध्या एक नवी लव्हस्टोरी सुरू झालीये. होय, करण कुंद्रा ( Karan Kunrdrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांच्यातील केमिस्ट्री हळूळहू बहरू लागली आहे. तेजस्वीवर माझा क्रश आहे, अशी कबुली करणने अकासासोबत बोलताना कधीच दिलीये. अशात करण व तेजस्वीचा एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. टास्कदरम्यान तेजस्वीची तब्येत अचानक बिघडते आणि करण कुंद्रा तिला हातावर उचलून तडक मेडिकल रूमकडे धावतो, असा हा व्हिडीओ आहे.
तर त्याचं झालं असं की, कॅप्टन्सी टास्कदरम्यान टेल्कम पावडर तेजस्वीच्या नाका-तोंडात गेल्याने ती जोरजोरात खोकलू लागते. तिला प्रचंड अस्वस्थ वाटू लागतं. करण कुंद्राला हे बघवत नाही. मागचा पुढचा विचार न करता तो तिला अलगद हातात उचलतो आणि बिग बॉसच्या घरातील मेडिकल रूमकडे धावतो. मेडिकल रूमचा दरवाजा उघडेपर्यंत तो तिला सोफ्यावरही मांडीवर घेऊन बसतो.
करण व तेजस्वीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय आणि यानंतर चाहत्यांनी तेजस्वी व करण या जोडीला 'Tejran' हे नावही बहाल केलं आहे.
करण व तेजस्वीचा याशिवाय आणखीही एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात दोघेही ‘इशारों इशारों में’ एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. या व्हिडीओत करण व तेजस्वी एकांतात गप्पा मारताना दिसत आहेत. माझं लग्न माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी लहान मुलीशी होईल, असं मला एका ज्योतिषानं सांगितल्याचं करण तेजस्वीला सांगतो. यावर बघ, तुला माझी गरज आहे, असं तेजस्वी हसत हसत त्याला म्हणते.