Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात राडे; जय भानुशालीने केली आईवरुन शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:00 IST2021-10-13T15:00:00+5:302021-10-13T15:00:00+5:30
Bigg boss 15: टास्क खेळत असताना शमिताला दुखापत झाली असती तर या मुद्द्यावरुन जय व प्रतिकमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं.

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात राडे; जय भानुशालीने केली आईवरुन शिवीगाळ
छोट्या पडद्यावर कायम गाजत असलेल्या ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) १५ व्या पर्वाची सुरुवात चांगलीच जोरदार पद्धतीने झाली आहे. हा शो सुरु झाल्यापासून घरातील स्पर्धक सातत्याने चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वीच गौतम गुलाटी आणि डायेंड्रा सोरेस यांच्या घरातील वर्तणुकीमुळे चर्चेत आले होते. हे दोघंही बाथरुममध्ये एकत्र गेल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर अश्लीलतेचे आरोप केले होते. इतकंच नाही तर यंदाच्या पर्वातील स्पर्धक त्यांची पातळी सोडून वागत असल्याची टीकाही अनेकांनी केली होती. यामध्येच आता पुन्हा एकदा हे पर्व चर्चेत आलं आहे. सेलिब्रिटी स्पर्धक जय भानुशाली (Jay Bhanushali) याने एका टास्कदरम्यान अन्य स्पर्धकाला आईवरुन शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे.
सध्या बिग बॉस १५ मध्ये 'जंगल में खुंखार दंगल' हा टास्क रंगत आहे. या टास्कसाठी स्पर्धकांच्या दोन टीम नेमल्या आहेत. यात एक जंगलवासी आणि दुसरी टीम घरवासी अशी आहे. या टास्कच्या ५ राऊंड होणार असून या टास्क दरम्यान जय आणि प्रतिक सहजपाल यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी जयने त्याची मर्यादा ओलांडत प्रतिकला आईवरुन शिवीगाळ केली.
Bigg Boss: अश्लीलतेचा कळस! किसिंग सीनपासून चादर शेअर करेपर्यंत स्पर्धकांनी पार केल्या मर्यादा
टास्क खेळत असताना शमिताला दुखापत झाली असती तर या मुद्द्यावरुन जय व प्रतिकमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. यात किरकोळ वादाचं रुपांतर मोठ्या वादात झालं आणि त्यातूनच जयने शिवीगाळ केली. त्यानंतर प्रतिकने स्वत:लाच मारण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर नंतर तो जोरजोरात रडू लागतो.
दरम्यान, या प्रकारानंतर शमिता आणि विशाल कोटियन प्रतिकला समजवायचा प्रयत्न करतात. परंतु, प्रतिकचं स्वत:वरील नियंत्रण सुटल्यामुळे तो स्वत:ला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे सध्या जय-प्रतिकमधील भांडणं चर्चेत आलं असून अनेकांनी जयवर टीकास्त्र डागलं आहे.