Bigg Boss 15 PROMO: अर्ध्या रात्री राखी सावंतला झालं काय ? पाहून घरच्यांनाही फुटला घाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:56 PM2021-12-27T17:56:31+5:302021-12-27T18:00:40+5:30
Bigg Boss 15, Rakhi Sawant : मागच्या सीझनमध्ये राखीच्या अंगात ज्युलीचं भूत आलेलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच. या सीझनमध्येही राखीचा नवा अवतार दिसला. होय, बिग बॉस 15 चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) सध्या अंतिम टप्प्यात आहे. पण म्हणून बिग बॉसच्या घरातील करामती थांबायच्या नाहीत. राखी सावंत (Rakhi Sawant) आहे म्हटल्यावर तर बिग बॉसच्या घरात काय होईल याचा नेम नाही. मागच्या सीझनमध्ये राखीच्या अंगात ज्युलीचं भूत आलेलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच. या सीझनमध्येही राखीचा नवा अवतार दिसला. होय, बिग बॉस 15 चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हिडीओत राखी तिच्या बेडवर झोपलेली दिसतेय. रूमचे लाईट्स बंद आहेत आणि उमर व रश्मी आपल्या बेडवर लेटून गप्पा करत आहेत. अशात अचानक राखी हातपाय आपटायला लागते. जोरजोरात अंगाला झटके द्यायला लागते. तिची ती अवस्था पाहून उमर व रश्मी सुद्धा घाबरतात. ब्लँकेट डाल के आऊं क्या उस पे, असं म्हणून रश्मी ब्लँकेट घेऊन राखीजवळ जाते आणि दुरून ब्लँकेट तिच्यावर टाकण्याचा प्रयत्न करते. पण त्याआधी राखी पुन्हा जोरजोरात झटके द्यायला लागते आणि रश्मी घाबरून पळून जाते.
यानंतर उमर राखीजवळ जातो. पण तो तिचा स्पर्श करताच राखी जोरानं किंचाळू लागते. प्रतीक, उमर व रश्मीची हे पाहून चांगलीच घाबरगुंडी उडते.
राखी सावंतला तसंही ड्रामा क्चिन म्हटलं जातं. हा तिचा नवा ड्रामा आहे की खरंच झोपेत तिला काहीतरी होतंय, हे लवकरच कळेलच. तोपर्यंत तुम्हीही व्हिडीओ पाहून लावायचा तो अंदाज लावा...