Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात रोज नवा ड्रामा, ढसाढसा रडला राजीव अदातिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 10:26 AM2021-10-27T10:26:23+5:302021-10-27T10:32:38+5:30
Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात रोज नवा ड्रामा ठरलेला. कधी भांडण, कधी राडा, कधी मैत्री, कधी रोमान्स असं सगळं सुरू असताना ‘बिग बॉस15’च्या कालच्या एपिसोडमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
बिग बॉसच्या घरात रोज नवा ड्रामा ठरलेला. कधी भांडण, कधी राडा, कधी मैत्री, कधी रोमान्स असं सगळं सुरू असताना ‘बिग बॉस15’च्या ( Bigg Boss 15) कालच्या एपिसोडमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. होय, कॅप्टन्सी टास्क सुरू असतानाच सिंगर अफसाना खान (Afsana Khan) हिने राजीव अदातियावर (Rajiv Adatia)अशी काही कमेंट केली की, राजीव ढसाढसा रडला.
राजीव हा शमिता शेट्टीचा मानलेला भाऊ आहे. नुकतीच त्याने वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. राजीवही कॅप्टन्सी टास्कचा भाग होता. यादरम्यान अफसानाने त्याची टर उडवत त्याचे बॉडी शेमिंग केले. तू कोणत्याचं जागेत फिट होणार नाही, असं अफसाना म्हणाली. अफसानाची ही कमेंट राजीवच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि तो भडकला. शमिताही त्याच्या बाजूने उभी झाली. अफसानाने लगेच माफी मागितली. पण यानंतर राजीव ढसाढसा रडला. मला थायरॉईड आहे. म्हणून मी असा आहे, असं म्हणत तो रड रड रडला.
याआधी अफसानाने शमिताच्या वयावर अशीच कमेंट करत तिला म्हातारी म्हटले होते. यावर सलमानने अफसानाचा चांगलाच क्लास घेतला होता.
राजीव हा वयाच्या 18 व्या वर्षापासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह आहे. टीव्ही असो वा बॉलिवूड बडे बडे सेलिब्रिटी त्याला ओळखतात.राजीवने आर्ट्समध्ये डिग्री घेतलीये. सायकॉलॉजीमध्ये त्याचं स्पेशलाइजेशन आहे. राजीव आहे बिझनेसमॅन आहे. प्रोड्यूसर आणि मोटिवेशनल स्पीकर अशीही त्याची ओळख आहे.राजीव हा शेट्टी सिस्टर्सच्या खूप जवळ आहे. शमिता व शिल्पा दोघीही राजीवला राखी बांधतात. त्यामुळे बिग बॉसच्या घरात राजीवची एन्ट्री शमिताला मोठा आधार ठरणार आहे.
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेला राजीव बॉलिवूड इंडस्ट्रीच्या जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारला ओळखतो. लता मंगेशकर, करण जोहर, दीपिका पादुकोण, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, सोनू निगम अशा अनेकांची त्याची चांगली मैत्री आहे. 18 व्या वर्षी राजीवने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली होती. यादरम्यान त्याच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर शिक्षण पूर्ण करून राजीवने बिझनेस सुरू केला. या एका डेकोर कंपनीचा तो एक भाग आहे. याशिवाय राजीवने एक इव्हेंट कंपनीही सुरू केली. ही कंपनी अनेक बॉलिवूड व हॉलिवूड स्टार्ससोबत काम करते.