Bigg Boss 15 : माझ्यासोबत राहायचं असेल तर..., राखी सावंतनं नवरोबाला खडसावलं!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:07 PM2022-01-25T17:07:46+5:302022-01-25T17:08:56+5:30

Bigg Boss 15, Rakhi Sawant : राखीचं खरंच लग्न झालंय का? रितेश खरंच तिचा पती आहे का? असे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. आता राखीने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

bigg boss 15 rakhi sawant reveals she is not legally married might get seprate from ritesh | Bigg Boss 15 : माझ्यासोबत राहायचं असेल तर..., राखी सावंतनं नवरोबाला खडसावलं!!

Bigg Boss 15 : माझ्यासोबत राहायचं असेल तर..., राखी सावंतनं नवरोबाला खडसावलं!!

googlenewsNext

Bigg Boss 15 : ड्रामा क्वीन राखी सावंतचं  (Rakhi Sawant) लग्न खरंच झालंय की लग्नाचा हा सर्व ड्रामा खोटा आहे, हे कळायला काहीही मार्ग नव्हता. मी लग्न केलंय, असं राखीने जाहिर केलं होतं. पण दीर्घकाळ तिच्या या नवऱ्याचा पत्ता नव्हता. अखेर ‘बिग बॉस 14’मध्ये  (Bigg Boss 15) राखीचा पती रितेशचा चेहरा दिसला. त्याने या शोमध्ये राखीसोबत एन्ट्री घेतली. पण या रितेशबद्दल असे काही खुलासे झालेत की, सगळेच चाट पडलेत. रितेश आधीच विवाहित असल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर त्याची पहिली पत्नी स्निग्धा प्रिया हिने मीडियासमोर येत अनेक धक्कादायक खुलासे केलेत.  अशात राखीचं खरंच लग्न झालंय का? रितेश खरंच तिचा पती आहे का? असे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. आता राखीने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
बिग बॉस 15’च्या घरात रेडिओ जॉकीला दिलेल्या मुलाखतीत राखी तिच्या लग्नाबद्दल आणि रितेशबद्दल बोलली.

नवऱ्याला सर्वांसमोर आणण्यासाठी तू ‘बिग बॉस 15’ची निवड का केली? तू रितेशची कायदेशीर पत्नी आहेस का? असा प्रश्न राखीला यावेळी केला गेला. यावर ती म्हणाली, ‘बिग बॉस 14’मध्ये मी विवाहित आहे, असं मी सांगत होते. पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. त्याचं मला खूप वाईट वाटलं होतं. त्यावेळी मी भारतात येऊन लग्नाची घोषणा करण्यासाठी एक रिसेप्शन ठेवणार आहे, असं माझा पती म्हणाला होता. पण  याचदरम्याना मला ‘बिग बॉस 15’ची ऑफर आली. पैशांचा प्रश्न होता. म्हणून मी ऑफर स्वीकारली आणि याच शो नवऱ्याची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला. हा खूपच लोकप्रिय शो आहे आणि त्यामुळेच मी हा निर्णय घेतला.

तर आम्ही वेगळं झालेलंच चांगलं...
रितेश तुझा कायदेशीर पती आहे का? यावर ती म्हणाली, आमचं कायदेशीर लग्न झालेलं नाही. आम्ही एका खोलीत परमेश्वराला साक्षी मानत लग्न केलं होतं. कायद्याच्या नजरेत मी अद्यापही अविवाहित आहे. रितेश घरी माझी वाट पाहत आहे, असं माझ्या आईने मला सांगितलं. पण  आता रितेशला हे लग्न कायदेशीर करावं लागेल. जोपर्यंत तो लग्न रजिस्टर करत नाही आणि मला लग्नाचं प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत मी त्याच्यासोबत राहणार नाही, हा माझा निर्णय पक्का आहे.   मी चांगली व्यक्ती आहे असं त्याला वाटत असेल तरच त्यानं हे नातं पुढे न्यावं. मला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही. एक पत्नी म्हणून मला माझे अधिकार हवे. त्यामुळे त्याने मला लग्नाचं प्रमाणपत्र द्यावं. त्यानंतर मी त्याच्यासोबत अख्खं आयुष्य घालवण्यासाठी तयार आहे. त्याला हे शक्य नसेल तर  आम्ही वेगळं झालेलंच चांगलं.'

याआधी  एका एपिसोडमध्येही राखीने तिचं व रितेशचं लग्न कायदेशीर नसल्याचा  खुलासा केला होता. ‘ माझ्याशी लग्न होण्याआधीच रितेश विवाहित होता. त्याला एक मुलगा देखील आहे. पण रितेशनं त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेतल्यानं त्याचं माझ्याशी झालेलं लग्न हे कायदेशीर नाही,’ असं राखीनं सांगितलं होतं.
 

Web Title: bigg boss 15 rakhi sawant reveals she is not legally married might get seprate from ritesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.