‘ती’ माझी कायदेशीर पत्नी नाही..., राखी सावंतच्या पतीचा खुलासा, वाचून तुम्हाला ही बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 11:38 AM2021-12-22T11:38:07+5:302021-12-22T11:39:23+5:30
Ritesh On Marriage With Rakhi Sawant : राखी सावंतचा पती रितेश नुकताच ‘Bigg Boss 15’च्या घरातून आऊट झाला. आता काय तर घरातून बाहेर पडताच रितेशने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Bigg Boss 15 : ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचा (Rakhi Sawant) एनआरआय पती कोण? तो दिसतो कसा, करतो काय? हे जाणून घेण्यास चाहते कमालीचे उत्सुक होते. अखेर दोन वर्षांनी राखीचा पती रितेश (Ritesh ) जगासमोर आला. ‘बिग बॉस 15’मध्ये राखीसोबत त्याने धमाकेदार एन्ट्री केली. अर्थात ‘बिग बॉस 15’च्या घरात पती पत्नी म्हणून रितेश व राखी फार काही सुखाने नांदले नाहीत. नुकताच रितेश घरातून आऊट झाला. आता काय तर घरातून बाहेर पडताच रितेशने एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, राखी व माझं लग्न वैध नाही, असा शॉकिंग खुलासा त्याने केला आहे. (Ritesh On Marriage With Rakhi Sawant )
रितेश ‘बिग बॉस 15’च्या घरात असताना त्याची पहिली पत्नी स्निग्धा प्रिया अचानक समोर आली होती. तिने रितेशवर कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर आरोप केला होता. शिवाय रितेश एनआरआय असल्याचं खोटं सांगतोय, असा दावाही तिने केला होता. तेव्हा रितेश ‘बिग बॉस 15’च्या आत होता. त्यामुळे स्निग्धा प्रियाच्या आरोपांत किती तथ्य आहे हे कळायला मार्ग नव्हता. मात्र ‘बिग बॉस 15’च्या बाहेर येताच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो यावर बोलला.
काय म्हणाला रितेश?
राखीसोबतचं लग्न केल्यानंतर दोन वर्ष तू मीडियासमोर का आला नाहीस? असं विचारलं असता तो म्हणाला, लग्न ही माझ्यासाठी खूप खासगी गोष्ट आहे. माझ्या पहिल्या पत्नीने माझ्यावर आरोप लावले आहेत. हे होणार हे मला ठाऊक होतं. त्यामुळे सगळं काही स्पष्ट झाल्यावर, वाद मिटल्यानंतर राखीसोबत एक फॉर्मल लग्न करण्याचा माझा विचार होता. कारण राखीच्या करिअरची गोष्ट होती. माझेही काही प्रोजेक्ट रखडले होते.
ती दोनदा पळून गेलीये...
माझी पहिली पत्नी दोनदा माझ्या घरातून पळून गेली आहे. दुसºयांदा ती गेली, तेव्हापासून माझा तिच्याशी काहीही संपर्क नाही. मी घटस्फोटाची कागदपत्रं तयार केली आहेत. पण ती स्वाक्षरी करायला तयार नाही. तिच्या आरोपांबद्दल मी एवढं सांगेल की, तिचे आरोप खोटे आहेत. तुम्ही बिग बॉसच्या घरात माझा स्वभाव पाहिला आहे. मी मारहाण करू शकत नाही. मी मारहाण करत होतो तर ती इतक्या दिवस माझ्याकडे का राहिली? ती खोटं बोलतेय. मी लवकरच एक पत्रपरिषद घेऊन माझ्यावरच्या सर्व आरोपांना उत्तर देईल, असं तो म्हणाला.
राखी माझी कायदेशीर पत्नी नाही...
राखी सावंतसोबत माझं अद्याप कायदेशीर लग्न झालेलं नाही. कारण पहिल्या पत्नीने अद्याप मला घटस्फोट दिलेला नाही. राखी व मी आम्ही परमेश्वराला साक्षी ठेवून एकमेकांना पती-पत्नी मानलं आहे. पण आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं नाही. मी राखीला स्वीकारलं आहे. पण कायदेशीररित्या मला माझ्या घटस्फोटाची प्रतीक्षा आहे. माझा घटस्फोट होताच मी राखीसोबत कायदेशीर लग्न करेल, असंही रितेश म्हणाला.