Bigg Boss 15 : रोमान्स से शो नहीं चलता भाई...! सलमान भडकला, ईशानला दाखवला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 11:59 IST2021-11-08T11:58:29+5:302021-11-08T11:59:30+5:30

Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) या आठवड्यात डबल इविक्शनचा धमाका झाला. शनिवारी मायशा अय्यर (Miesha Iyer) शोमधून बाद झाली आणि काल रविवारी ईशान सहगल (Ieshaan Sehgaal) हाही शोमधून आऊट झाला.

Bigg Boss 15 Salman Khan Eliminates Ieshaan Sehgaal Saying Romance Ke Bal Pe Nahi Chalta Show Also Warns All Housemates | Bigg Boss 15 : रोमान्स से शो नहीं चलता भाई...! सलमान भडकला, ईशानला दाखवला बाहेरचा रस्ता

Bigg Boss 15 : रोमान्स से शो नहीं चलता भाई...! सलमान भडकला, ईशानला दाखवला बाहेरचा रस्ता

बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) या आठवड्यात डबल इविक्शनचा धमाका झाला. दोन सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. शनिवारी मायशा अय्यर (Miesha Iyer) शोमधून बाद झाली आणि काल रविवारी ईशान सहगल (Ieshaan Sehgaal) हाही शोमधून आऊट झाला. सलमान खानने (Salman Khan ) ईशानच्या इविक्शनची घोषणा केली आणि सोबतच घरातील सर्वांना इशाराही दिला.
बिग बॉस 15 सुरू  होऊन आठवडा होत नाही तोच, ईशान व मायशा यांच्यात प्रेम फुललं होतं. पहिल्याच आठवड्यात ईशान व मायशा प्रेमात पडलेले पाहून  पाहून सलमान खानही अवाक् झाला होता. हा बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या सीझनमधील सर्वात ...  आहे, असं तो म्हणाला होता. ईशान सहगल  व मायशा अय्यर  दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की, आपण नॅशनल टीव्हीवर आहोत, याचाही त्यांना विसर पडला होता. अगदी नॅशनल टीव्हीवर एकच ब्लँकेट शेअर करण्यापासून किस करेपर्यंतच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या होत्या. सलमानने वेळोवेळी दोघांनाही समज दिली होती. शोमध्ये फक्त रोमान्स चालणार नाही. खेळ दाखवा, अशा स्पष्ट शब्दांत सलमानने ईशान व मायशाला समजावलं होतं. पण दोघांवरही याचा काही परिणाम झाला नाही. 

रविवारी ‘वीकेंड का वार’ची सुरूवात होताच मायशा घराबाहेर गेल्यानंतर कसं वाटतंय? असा प्रश्न सलमानने ईशानला केला. यावर, अजिबात चांगलं वाटतं नाहीये. मायशा नसताना मला कसं चांगल वाटणार? असं ईशान म्हणाला. त्याचं ते उत्तर ऐकून सलमान ईशानवर चांगलाच भडकला. ‘काय अपेक्षा होती ईशान तुला? गेल्या दोन आठवड्यांपासून मी समजावत होतो. पण तुम्ही दोघांनाही फरक पडला नाही. केवळ रोमान्सच्या भरवशावर हा शो नाही चालत भावा. तो एडिट होतो. तुमच्या रोमान्समध्ये ना मजा होती, ना तुम्ही कोणात मिसळत होता,’असं सलमान म्हणाला.
यानंतर सलमानने घरातील सदस्यांनाही समज दिली. मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की, आम्ही घरातील सदस्यांमध्ये ना वाद घडवतो, ना त्यांच्यात रोमॅन्टिक अँगल निर्माण करतो. हे करा, ते करा, हे आम्ही सांगत नाही. आम्ही ईशान व मायशाला हे करायला सांगितलं होतं? अजिबात नाही. तुम्ही घरात कसे वागता यावर आमचं नियंत्रण नाही. हा तुमचा शो आहे आणि तो हिट झाला तर श्रेय तुम्हाला मिळणार, फ्लॉप झाला तरी तुम्हाला दोष दिला जाणार. आम्ही टास्क देतो, नियम बनवतो. स्क्रिप्ट देत नाही. आमच्याकडे वीएफएक्सचं दुकानं नाही की, तुम्ही जे केलंत त्यापेक्षा काही वेगळं दाखवू,असंसलमानम्हणाला.

Web Title: Bigg Boss 15 Salman Khan Eliminates Ieshaan Sehgaal Saying Romance Ke Bal Pe Nahi Chalta Show Also Warns All Housemates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.