Bigg Boss 15 : देवोलिना भट्टाचार्जी शमिता शेट्टीला शिकवायला गेली अन् स्वत: ट्रोल झाली....!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:02 PM2021-11-02T17:02:47+5:302021-11-02T17:03:25+5:30
Bigg Boss 15 : काल बिग बॉसच्या घरात रश्मी देसाई, गौतम गुलाटी, देवोलिना भट्टाचार्जी आणि काम्या पंजाबी गेस्ट म्हणून आलेत आणि आल्याबरोबर घरातील स्पर्धकांना सल्ले द्यायला लागले. जणू शाळाचं घेतली ना समजा.
‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) घरात कधी काय होईल, याचा नेम नाही. काल बिग बॉसच्या घरात काही टीव्ही स्टार्स गेस्ट म्हणून आलेत आणि आल्याबरोबर घरातील स्पर्धकांना सल्ले द्यायला लागले. रश्मी देसाई, गौतम गुलाटी, देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) आणि काम्या पंजाबी अशा अनेकांनी घरात येताच एकएकाला धारेवर धरायला सुरूवात केली. जणू शाळाचं घेतली ना समजा. यादरम्यान देवोलिना शमिता शेट्टीवर (Shamita Shetty) अशी काही बरसली की, काही क्षण घरातील वातावरण चांगलंच तंग झालं. तू अफसानाची (Afsana Khan) माफी मागितली नाहीस. हे तुझं खूप चुकलं, असं काय काय देवोलिना शमिताला म्हणाली. पण यानंतर काय तर घराबाहेर देवोलिना वाईट पद्धतीने ट्रोल झाली. बिग बॉसच्या चाहत्यांनी देवोलिना एक ना अनेक गोष्टी सुनावल्या.
Haan boli hai and i have guts to own it and also appologised for each of my mistakes i did. Not like your chameeta didi jinko bhoolne ki bimaari hai or pretend karne ki. You guys seriously want this. I warn you dont start this. https://t.co/fPWi7U4WP6
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) November 2, 2021
एका युजरने शमिताचा क्लास घेणा-या देवोलिनाला टॅग करत ट्विट केलं. ‘अनेकांच्या भांडणादरम्यान म्हटलेल्या गोष्टी लक्षात राहत नाही. तू तर ‘घटिया औरत’ पेक्षाही घाणेरड्या शिव्या शोमध्ये दिल्या आहेस. तेव्हा गप्प बस,’अशा शब्दांत या युजरने देवोलिनाला फटकारलं. युजरचं हे ट्विट पाहून देवोलिनाचं माथं ठणकलं नसेल तर नवल. तिने लगेच याला उत्तर दिलं. ‘हो मी शिव्या दिल्यात. पण झालेल्या चुका स्वीकारून माफी मागण्याची हिंमत माझ्यात आहे. पण तुझ्या चमिता दीदीला विसरण्याचा आणि दिखावा करण्याचा आजार आहे. तुला हेच बघायचं असेल तर ठीक आहे. मी फक्त एवढंच म्हणेल, माझ्यासोबत हे सुरू करू नकोस, ’ असं ती म्हणाली.
देवोलिनाने का घेतली अफसानाची बाजू
देवोलिनाच्या मते, शमिता व अफसानाच्या भांडणात अफसाना नको ते बोलून चुकलीच. पण शमिता सुद्धा अफसानाला बरंच काही बोलली होती. मात्र सलमानने फक्त अफसानाला सुनावलं आणि नंतर अफसानाने माफीही मागितली. पण शमितानेही अफसानाला बºयाच वाईट गोष्टी म्हटल्या होत्या. त्यासाठी तिने अफसानाची माफी मागितली नाही.