Bigg Boss 15: 'जोड्या जुळवणं बंद कर'; शिल्पा शेट्टीचा राखीला खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 12:50 PM2022-01-18T12:50:41+5:302022-01-18T12:51:34+5:30

Bigg Boss 15: अलिकडेच झालेल्या 'विकेंड का वॉर'मध्ये राखी सावंतने करण आणि शमिताच्या अफेअरविषयी भाष्य केलं होतं. जे ऐकल्यानंतर शिल्पाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

bigg boss 15 shilpa shetty asks rakhi sawant not to pair shamita with karan kundrra | Bigg Boss 15: 'जोड्या जुळवणं बंद कर'; शिल्पा शेट्टीचा राखीला खोचक सल्ला

Bigg Boss 15: 'जोड्या जुळवणं बंद कर'; शिल्पा शेट्टीचा राखीला खोचक सल्ला

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील बिग बॉस 15 (Bigg Boss 15)  या शोचा ग्रँड फिनाले लवकरच रंगणार आहे. त्यापूर्वी या घरातील अनेक सदस्य विविध कारणांसाठी चर्चेत येत आहे. यामध्ये खासकरुन सोशल मीडियावर करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरु आहे. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये या जोडीमध्ये जोरदार भांडणं होत असून शमिता शेट्टी ( shamita shetty) या वादाला जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. करण आणि शमिता यांची जवळीक वाढत असून आता ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा दावा राखी सावंतने (rakhi sawant) केला होता. मात्र, राखीचे वक्तव्य अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (shilpa shetty) फारसं रुचलेलं दिसत नाही. तिने राखीची चांगलीच शाळा घेतली आहे.

अलिकडेच झालेल्या 'विकेंड का वॉर'मध्ये राखी सावंतने सलमानसमोर (salman khan) 'करण-शमिताची जोडी छान दिसते. पण, तेजस्वी मध्येच कुठून आली काय माहित', असं म्हटलं. राखीच्या या वाक्यानंतर तेजस्वी चांगलीच संतापली. इतकंच नाही तर शिल्पा शेट्टीनेही राखीला एक खोचक सल्ला दिला. काही दिवसांपूर्वीच या घरात राजीव अदातियाने 'बिग बॉस १५'मध्ये एन्ट्री केली आहे. यावेळचा एक प्रोमो समोर आला होताय या प्रोमोमध्ये शिल्पाने राखीला सल्ला दिला आहे.

"माझ्या प्रिय राखी, जोड्या जुळवणं बंद कर प्लीज. आमच्या घरात एक कुंद्रा आहे तो पुरेसा आहे", असा खोचक सल्ला शिल्पाने राखीला दिला. परंतु, शमिताच्या बहिणीने दिलेला हा सल्ला ऐकून उपस्थित सारेच स्पर्धक जोरजोरात हसायला लागले.

दरम्यान, घरातील स्पर्धकांनी जरी शिल्पाचा सल्ला हसण्यावारी नेला असला तरीदेखील शमिता आणि करण कुंद्रा यांची मैत्री शिल्पाला फारशी न आवडल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. 

Web Title: bigg boss 15 shilpa shetty asks rakhi sawant not to pair shamita with karan kundrra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.